खिर्डी येथे सेवा पंधरवडा अंतर्गत मंडळ कार्यालयात फेरफार अदालतीचे आयोजन
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। शासनाच्या आदेशानुसार १७ सप्टें ते २ ऑक्टोंबर पर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग,ग्रामविकास विभाग,तसेच सर्व शासकीय विभागाकडील महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित सेवांविषयी प्रलंबित कामांचा विहित वेळेत निपटारा करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खिर्डी येथील मंडळअधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी २८-सप्टेंबर-२०२२ रोजी सकाळी ११ वाजता फेरफार अदालत घेण्यात आली.
सदर फेरफार अदालतीत खिर्डी मंडळ अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांच्या प्रलंबित फेरफार नोंदी,तक्रारी नोंदीचा निपटारा करण्यात आला.तसेच शेत जमिनीच्या पोटखराब क्षेत्राचे लागवडीत रूपांतर करणेबाबत अर्ज, ई पीक पाहणी,ॲपद्वारे ई पीक पाहणी नोंदविण्याचे कार्यपध्दती बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.सरपंच, उपसरपंच,खिर्डी मंडळ अधिकारी मिना तडवी मॅडम, खिर्डी तलाठी श्री.एच.पी.जोशी,बलवाडी तलाठी,एन.पी.पाटील, कांडवेल तलाठी श्याम तिवाडे, अनंत कोळी कोतवाल,तसेच खिर्डी,धामोडी, शिंगाडी, या गावातील शेतकरी, खातेदार, प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.