खिर्डीसह पुरी गोलवाडे परिसरात पंन्नीची दारू झाली स्वस्त…. राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस मात्र मस्त
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील निभोंरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खिर्डी गाव, परिसरातील आजू बाजूची गावे, या सह पुरी गोलवाडे परिसरात अवैध दारूचे धंदे खुलेआम मोठ्या जोमाने चालत आहेत. मात्र याचा परिणाम गावातील तरूण लहान मुलांसह व्यसनाधीन व्यक्ती तसेच त्यांच्या परिवारावर होतांना दिसत आहे.
मागील काही वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत या केमिकल युक्त दारुमुळे बऱ्याचशा नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि याला कारणीभुत ठरत आहे ती म्हणजे हातभट्टी दारु होय. कारण या रसायनयुक्त बनवल्या जाणाऱ्या दारुच्या सेवनाने मानवी शरीरावर घातक असे दुषपरिणाम करणारे केमिकल भेसळ केले जाते व तिच दारु जिला विष बोलणे सुद्धा चुकीचे ठरणार नाही ती दारु दारुड्याना प्यायला दिली जाते. पैसा कमवण्याच्या उद्देशाने अवैध व्यवसायीक अजून किती नागरिकांचे बळी घेणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे ते म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागा सह, पोलीस प्रशासन .
या घडत असलेल्या प्रकाराचे कुठलेही गांभीर्य लक्षात न घेता डोळे असुन आंधळे होण्याचे काम स्थानिक प्रशासन मोठ्या सफाईने करित असल्याचे बोलले जात आहे. म्हणुनच मोठ्या थाटात या विष बनवणाऱ्या कारखान्यांना जणू कसे प्रशासनाने NOC दिली आहे की काय? असे सुद्धा बोलणे वावगे ठरणार नाही.
राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक प्रशासनाला हा सर्व प्रकार माहीत असूनही कारवाई का केली जात नाही? का या अवैध व्यवसायांना प्रशासनाचा आर्शिवाद तर नसावा? परवानगी शिवाय हे धंदे चालूच शकत नाहीत? का आर्थिक हितसंबंध जोपासणे नागरिकांच्या जीवापेक्षा मोठे आहेत? असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. गावठी दारु प्यायल्याने राज्यात नुकताच एकाच मृत्यू तर चार कामगार अत्यावस्थ आहेत. संबंधीत विभागाने हे जीवघेणे कारखाने त्वरित कायमस्वरूपी बंद करावे आशी मागणी जोर धरत आहे.