खिर्डी येथे शिवजन्मोत्सव निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। महाशिवरात्री व शिवजन्मोत्सव निमित्त खिर्डी बु येथील ग्राम पंचायत कार्यालयात निंभोरा पोलीस स्टे चे एपीआय गणेश धुमाळ यांच्या उपस्थितीत आज ५.३० वाजता आगामी सण उत्सव पाहता शांतता कमिटीची सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सामाजिक व जातीय सलोखा राखून एकोप्याने सण उत्सव साजरे करावेत तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आव्हान एपीआय गणेश धुमाळ यांनी केले आहे. यावेळी खिर्डी खु चे सरपंच राहुल फालक, पोलीस पाटील प्रदीप श्रीराम पाटील, पत्रकार गुणवंत पाटील,भीमराव कोचुरे, प्रवीण धुंदले, अंकित पाटील,घनश्याम पाटील,भास्कर पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ॲड.चंद्रजित पाटील, अल्ताफ बेग,रवी कोचुरे, सोनू पाटील,गफुर कोळी, धीरज पाटील,याकूब बेग, यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.