भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

बलवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या ४ जागांसाठी शांततेत मतदान

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा
खिर्डी ता.रावेर, प्रतिनिधी। तालुक्यातील बलवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया दि १८ डिसेंबर रविवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडली असून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पद गावात प्रतिष्ठेचं पद समजले जाते, सरपंच पद हे महीला जनरल निघाल्यामुळे निवडणूक मोठया चुरशीची झाली असून कोण बाजी मारणार याची उत्सुकता ग्रामस्थांना लागुन आहे.त्यामुळे गावागावात वेगवेगळे गट या निवडणुकीत आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले.

बलवाडी येथील ग्रामपंचायतीसाठी एकूण ८७ टक्के मतदान झाले.एकूण १६५३ पैकी १४३७ मतदारांनी आपला हक्क बजावला.मतदान केंद्रावर मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी ऑटोद्वारे वाहतुकीची व्यवस्था केली होती.
येथे ६ सदस्य बिनविरोध निवडून आले होते.तर ३ सदस्य व १ सरपंच अश्या ४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.निवडणूक अधिकारी म्हणून श्रीमती मिना तडवी यांनी काम पाहिले. तर मतदान प्रकिया शांतातेत पार पाडण्यासाठी निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद असल्याने कोण बाजी मारणार आहे.या निकालाची ग्रामस्थांना उत्सुकता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!