भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

निंभोरा येथे लोक प्रतिनिधींना गांवबंदी. प्रलंबित पीक विम्यासाठी शेतकरी आक्रमक

निंभोरा,ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार केळी उत्पादकांनी हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना अंतर्गत पिक विमा काढला.माञ कित्येक शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत केळी पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. प्रशासन व विमा कंपनी पिकविम्या प्रकरणी दुर्लक्ष करत असल्याने पीकविमा मिळाला नसलेल्या निंभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी निंभोरा येथील श्रीराम मंदिर सभागृहात बैठक घेतली यांत आमदार,खासदार,सह लोकप्रतिनिधीवर रोष व्यक्त करण्यात आला.केळी पिक विमा रक्कम मिळेपर्यंत गावांत सर्व पक्षीय आमदार, खासदार मंत्री,यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला

निंभोरा बु. सरपंचांसह तंटामुक्ती अध्यक्ष डिगंबर चौधरी, सौ. मंदाकिनी बऱ्हाटे, ललित कोळंबे, सचिन चौधरी, प्रशांत पाटील, वाल्मिकी पवार, हेमंत पवार, ज्ञानदेव नेमाडे, सदस्य अमोल खाचणे, अनिल बऱ्हाटे, संजय धांडे, कन्हैया भारंबे, शांताराम चौधरी,सयाजी पवार, शब्बीर मोहिद्दीन पटेल, सतिष पाटील, बाळु दामु पाटील, इसा पटेल, जितेंद्र चौधरी, प्रकाश दोडके, सुरेश मनुचारी, दिलीप चौधरी, बाळु दोडके, हरेश्वर चौधरी, भिकन बोंडे,सुधिर मोरे,सलिम पटेल,सुरेंद्र सोनवणे, नरेंद्र दोडके, विजय माळी,माधव बऱ्हाटे, युवराज बऱ्हाटे, विजय पवार, द्रोपदाबाई दोडके, विलास भोगे, अनिल दोडके, कुंदन भोगे, नोमदास भिरुड, चंद्रकांत चौधरी, मधुकर भोगे, सौ.ललिता हेमंत चौधरी, राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, प्रमोद कोंडे यासह परिसरातील शेतकरी ग्रामपंचायत कर्मचारी ही या बैठकीत उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!