चिचफाटा ते अजंदा रस्त्यावरील खड्डे देत आहेत अपघाताला आमंत्रण
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील ऐंनपुर खिर्डी रस्त्यावर असलेल्या चिचफाटा ते अजंदा हा रस्ता रावेर शहराला व बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर नेहमी अवजड वाहनांसह, दुचाकी,चारचाकी व प्रवाशी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून रस्ता खराब झाला आहे, या रस्त्यावरील खड्डे वाचविताना अनेकवेळा वाहन धारकांना त्रास होत असून किरकोळ स्वरूपाच्याअपघाताला सामोरे जावे लागते.त्यामुळे वाहन धारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची होत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून खड्डयांमुळे अपघाताला आयतेच आमंत्रण मिळत आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी पूर्वक लक्ष देवून रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी परिसरातील वाहन धारकांसह नागरिकांनी केली आहे.