भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील नागोळी नदीच्या बाजूच्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचा बनाव : २४ तासांच्या आतच पुन्हा जुगाऱ्यांची भरली जत्रा : आयजी पथकाच्या कारवाईची मागणी !

मंडे टू मंडे विशेष प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील महाराष्ट्र -मध्यप्रदेश सीमेवरील चोरवड/खानापूरच्या दरम्यान असलेल्या नागोळी नदीच्या बाजूला कायदा धाब्यावर बसवून पत्ता जुगाराचे अड्डे कसे खुलेआम आहेत याबाबत वास्तव मंडे टू मंडे न्युज च्या टीम ने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आले. या धक्कादायक स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ आपण येथे क्लिक करून बघू शकता. या क्लबवर दररोज लाखो रुपयांचा जुगार खेळला जात असून या बाबत Video चित्रणासह “मंडे टू मंडे न्युज” ने स्टिंग ऑपरेशन केल्याने तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेव भले मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. पोलीस धाड टाकण्याचे सांगण्यात आले खरी मात्र पोलीस प्रशासन कारवाईला अजून २४ तास होत नाही तोपर्यंतही जुगार अड्ड्याचे साम्राज्य रोखण्यात अपयशी ठरले असून लागलीच दुसऱ्या दिवशी अड्डा तेजीत सुरू झाला आहे. यामागे वरपर्यंत हप्ते खोरीचे मायाजाल असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.

“Video स्टिंग ऑपरेशन : महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर जुगार सम्राटाचे साम्राज्य भक्कम : अड्ड्यावर दररोज लाखोंची उलाढाल ! पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह ?” या मथळ्याखाली video स्टिंग ऑपरेशनसह बातमी प्रसिद्ध केली होती, सदरच्या बातमीने परिसरासह जिल्ह्यात पोलीस दलासह अवैध धंद्यांवाल्यांमध्ये खडबड माजली, या बातमीची नाईलाजास्तव का होईना पोलिसांना दखल घ्यावी लागली, पोलिसांनी रेड टाकण्याचा बनाव दाखवून चार-पाच जुगाऱ्यांवर कारवाई करून पाच हजार रुपये जप्त केले आश्चर्याची गोष्ट म्हणजे लाखोंची उलाढाल असणाऱ्या जुगार अड्ड्यावर फक्त ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येणे हे विशेष सर्व प्रकार बनाव करत धूळ फेक करण्याचा प्रयत्न केला. किंवा आणखी कुठली आर्थिक गणित जुळली हा संशोधनाचा विषय परंतु धाड टाकल्याची प्रत्यक्षात वस्तुस्थिती अत्यंत विपरीत आहे ती अशी, मंडे टू मंडे ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अवैध जुगाराचे भांडाफोड झाला तोही व्हिडिओ चित्रनासह यामुळे कारवाई दाखवण्याच्या उद्देशाने चार-पाच पोलीस जुगार अड्ड्याकडे रवाना झाले अड्ड्याच्या बाजूला रस्त्यावरच उभे राहून जुगार मालकाला बोलावणे धाडले त्यात चर्चा झाल्यानंतर ४ ते ५ माणसे केस दाखवण्यासाठी पाठवून द्या, सांगितले म्हणून जुगार अड्ड्यावर रेट टाकून यांचेवर केस दाखल केली, असा बनाव करण्यात असल्याची खात्री लायक माहिती छापा मारल्याच्या खोलवर गेले असता मंडे टू मंडे च्या टीमला मिळाली. म्हणजेच एकंदरीत संपूर्ण रेडचा बनाव हा ” मॅनेज ” बनाव असल्याची चर्चा ऐकायला मिळत असून म्हणजे रेड न टाकता रेड दाखवण्यात आली. विशेष म्हणजे त्या भागातील पोलीस अधिकारी, बीट जमादार यांना मॅनेज करून हा व्यवसाय राजरोसपणे पुन्हा चालू करण्यात आल्याचीही चर्चा परिसरात रंगली आहे.

सद्या परिस्तिथी अशी आहे की, सदरचा जुगार अड्डा त्या ठिकाणाहून हलवून त्या ठिकाणा पासून एक किलोमीटर अंतरावर अजनाड रस्त्यावरील नागोळी नदी वरील अजनाड चोरवड शिवारात नागोली नदीवरील कॅटेवेअर जवळ एक दिवसासाठी सुरू केला होता परन्तु पुन्हा त्याच   पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे नागोळी नदीच्या बाजूला मोठ्या जोमाने हा जुगार अड्डा सुरू आहे.

असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतोय. या बाबत धक्कादायक माहिती पुढील बातमीत लवकरच वाचा.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!