भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेरसामाजिक

सांगवे तालुका रावेर येथे आदिवासींच्या घरात पावसाचे पाणी….. ग्रामपंचायत चा कारभार चव्हाट्यावर

ऐनपुर,ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर येथून जवळच असलेल्या सांगवे गावात पावसाचे पाणी येथे राहत असलेल्या आदिवासी लोकांच्या घरात शिरल्याने आदिवासी लोकांचे त्या घरात राहणे मुश्कील झाले आहे सांगवे विटवे ही गृप ग्रामपंचायत असून सांगवे येथील ग्रामस्थांनी वेळोवेळी तोंडी किंवा लेखी स्वरूपात गावातील सांडपाणी काढणे बाबत वारंवार सांगूनही सदर गावातील सांडपाण्याची व्यवस्था ग्रामपंचायत ने केली नाही ऐन पावसाळ्यात पावसाचा जोर वाढला असता गावातील सांडपाणी या ठिकाणी राहत असलेल्या मागासवर्गीय व आदिवासी लोकांच्या घरात शिरल्याने त्यांची तारांबळ उडाली.

या बाबतीत आज दिनांक 14 जुलै 2022 रोजी नायब तहसीलदार संजय तायड़े यांना निवेदन देण्यात आले निवेदनात असे म्हटले आहे कि गृप ग्रामपंचायत विटवे यांच्या कड़े लेखी व तोड़ी स्वरुपात सांगितले तरीही सदर सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने आज पावसाचे जास्तीचे पाणी आदिवासींच्या घरात शिरले व त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून घराच्या भिंती पडक्या झालेल्या आहेत त्या केव्हाही कोसळून पडु शकतात त्यामुळे जीवित हानी होऊन संसार उघड्यावर येऊ शकतो अशा आशयचे निवेदन देण्यात आले निवेदनावर, जनक्रांती मोर्चा युवा जिल्हा अध्यक्ष, साहेबराव वानखेड़े पं. समिती सदस्य दिपक पाटील ग्रा. पं. सदस्य. सुरेश कोळी, रतन भिल्ल, शिवाजी कोळी, गजानन कोळी, वंदना भिल्ल, उषाबाई भिल्ल, कंबाबाई कोळी, सखुबाई भिल्ल, शुभम कोळी, विमलबाई भिल्ल, छाया बाई भिल्ल, यांच्या सह्या आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!