भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रायपुर ग्रामपंचायत अपात्र प्रकरण: जिल्हाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा आदेश नाशिक आयुक्तांकडून कायम

तासखेडा.ता.रावेर.मंडे टू मंडे न्युज,अनिल इंगळे ।
रावेर तालुक्यातील रायपुर ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश युवराज पाटील, उपसरपंच तुकाराम सखाराम तायडे, सदस्य सौ.रेखाबाई तायडे, सौ.माधुरी चौधरी व प्रकाश तायडे (मयत)अश्या पाच जणांना ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे रायपुर येथिल मनोहर लक्ष्मण पाटील यांच्या तक्रार अर्जावरुन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम१४(१)( ज-३) अन्वये शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपाखाली अपात्र ठरवून १९ जुलै रोजी निर्णय परित केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या अपात्र तेच्या निर्णयाला आव्हान देत या चारही जणांनी औरंगाबाद खंड पिठाकडे दाद मागितली असता दि.२४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंड पिठाने या चारही जणांना दिलास देत जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला तूर्तास स्थगिती दिली होती. मात्र तक्रारदार मनोहर पाटील यांनी सुद्धा या स्थगितीच्या आदेशाला आव्हान देत अपील दाखल केले होते, त्या अपीलावर आज दि. ३० सप्टेंबर रोजी अप्पर आयुक्त नाशिक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कायम केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!