रावेर पंचायत समितीमध्ये ३ कर्मचारी कोरोना संक्रमित !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर (प्रतिनिधी)। राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असून दिवसागणित बाधित रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे वास्तव दिसून येते आहे त्यात रावेर तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला होता आता येथील पंचायत समितीमध्ये कोरोनाने शिरकाव केला असून येथील ३ जण कोरोना संक्रमित तर २ कर्मचा-यांची फॅमेली पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
रावेर पंचायत समितीत ३ कर्मचारी कोरोना संक्रमित झाल्याने व २ कर्मचा-यांची फॅमिली पॉझिटीव्ह आढळून आल्याने पंचायत समितीच्या गेटवर येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात असून पंचायत समितीचे कामकाज हे खिडकीद्वारे चालवण्यात येत असून ग्रामीण जनतेने काम असेल तरच पंचायत समितीमध्ये येण्याचे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच गट विकास अधिकारी किंवा सभापती उपसभापती यांना कामानिमित्त भेटण्यासाठी येणा-यां नागरिकांना एक एक करून आत सोडले जात आहे. रावेर तालुक्यात सद्या स्थितीत २ हजार ९२० पेशंट कोरोना पॉझिटीव्ह असून ११० जणांचा कोरोनामुळे दगावले आहे.