भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर नगरपालिकेची २४ नगरसेवकांसाठी १२ प्रभाग रचना जाहीर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्यातील इतर नागरपालिकांप्रमाणे रावेर नगरपालिकेची प्रभाग रचना सुद्दा आज १० मार्च रोजी जाहीर करण्यात आली.रावेर नगरपालिकेचे एकूण १२ प्रभाग असून या १२ प्रभागातून २४ नगरसेवकांची निवड करण्यात येईल.या प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी १० मार्च २०२२ ते १७ मार्च २०२२ ही अखेरची मुदत असून कोणाला हरकत घ्यायची असल्यास त्यांनी पालिका कार्यालयात हरकती जमा कराव्यात अशी माहिती रावेर मुख्याधिकारी यांनी दिली.

अशी राहील रावेर पालिकेची प्रभाग रचना
प्रभाग क्रमांक १ – महात्मा फुले चौक, भगवती नगर, मरीमाता मंदीर परीसर नागझिरी पोलिस चौकीच्या समोरील भाग.
प्रभाग क्रमांक २ – छत्रपती शिवाजी परीसर व प्लॉट एरिया तसेच पाराचा गणपती परीसर, तसेच जहागीरदार वाडा परीसर.
प्रभाग क्रमांक ३ – मंगरूळ दरवाजा परीसर, तिरुपती टॉकीज परीसर, भोई वाडा भाग रथगल्ली परीसर मोमीनवाडा भाग.
प्रभाग क्रमांक – लंगडा मारोती मंदीरा समोरील भाग, आठवडे बाजार, परीसर गजानन नगर, अपु गल्ली परीसर, मेनरोड भाग.

प्रभाग क्रमांक ५ – विखे चौक परीसर दत्तमंदीर भाग, बाविशी गल्ली भाग, इमाम वाडा भाग, रींगरोड परीसर
प्रभाग क्रमांक ६ – थडा मारोती परीसर, अब्दुल हमीद चौक परीसर, इमाम वाडा भाग, देशमुखवाडा भाग, नगरपालिका गढीचा भाग
प्रभाग क्रमांक ७ – कौसर मशिद परिसर, इमाम वाडा भाग, मरकज मस्जिद परिसर, मास्तर कॉलनी.
प्रभाग क्रमांक ८ – कुलफऐ राशेदिन मशिद परिसर, गन १२८३ मधिल नगरपालिका हॉल परीसर, उटखेडा रोड, सप्तश्रुगी मंदिर परीसर, ईदगहा रोड परीसर.

प्रभाग क्रमांक ९ – उटखेडा रोड परीसर, रुस्तम चौक परिसर, डॉ आंबेडकर नगर भाग.
प्रभाग क्रमांक १० -उटखेडा रोड परिसर, जूना सावदा रोड परिसर, तिरुपती नगर परिसर, पिपल्स बँक कॉलनी परीसर.
प्रभाग क्रमांक ११ -डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, भाग स्टेशन रोड पेट्रोल पंप परीसर मराठा मंगल कार्यालय समोरील भाग न्यायालया समोरील भाग
प्रभाग क्रमांक १२ -व्ही.एस. नाईक कॉलेज परीसर स्वामी समर्थ केंद्र परीसर, विद्या नगर, सोनू पाटील, नगर परीसर, मराठा मंगल कार्यालय परीसर, रेल्वे स्टेशन परीसर ,अशी असून निवडणुकीच्या रणधुमाळी कडे रावेर वासीयांचे लक्ष्य लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!