रावेर पंचायत समिती निधी वाटपात मापात पाप’; डावलले सत्ताधाऱ्यांसह विरोधीसदस्य आक्रमक !
भाजपच्या चार सदस्यांनी लाटला निधी : भाजपच्या सहकारी सद्यस्यांसह विरोधी सदस्यांना डावलल्याने फुटले बिंग !
मंडे टू मंडे, विशेष वृतांत : रावेर पंचायत समितीला सन २०२१-२२ साठी मिळालेला विकास निधी सत्ताधाऱ्या सह विरोधी सदस्यांना डावलून समान वाटप न करता सभापतीनी स्वतःसह भाजपाच्या चार सदस्यांनी सर्वाधिक निधी घेऊन विकास निधी वाटप केल्याने विरोधी सदस्यांसह, निधी न मिळालेल्या सत्ताधाऱ्यांसह आठही विरोधी सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली आहे. माधुरी नेमाडे,प्रतिभा बोरोले,योगिता वानखेडे, योगेश पाटील यांना काहीही निधी मिळाला नाही.आजपर्यंत विरोधी सदस्यांसह सर्व सदस्यांना समान निधी वाटपाची परंपरा राहीलेली असतांना सभापती कविता कोळी, उपसभापती धनश्री सावळे आल्यापासून पंचायत समितीचे गणित बिघडल्याचे मनमानी सुरू असल्याचे या सर्व प्रकाराने समोर आल्याने बिंग फुटले आहे.या बाबत चर्चेला उधाण आले आहे.
जिल्ह्यातील रावेर पंचायत समितीला सन २०२१-२२ या वर्षासाठी १ कोटी ७३ लाख रुपये निधी मिळाला होता. त्यापैकी १० टक्के निधी प्रशासकीय खर्चासाठी काढून उर्वरीत १ कोटी ५६ लाख निधीचे समान वाटप करण्याचे मागील सभेत एकमाने ठरले होते. त्यानुसार प्रत्येक सदस्याला १५ लाख रु निधी मिळणार होता. त्यासाठी दिद पट जादाच्या कामांचे सुमार २२ लाख रुपयाचे विकास कामांचे प्रस्ताव सादर करण्याचा सदस्यांना सुचना देण्यात आल्या होत्या. सर्व सदस्यांनी आपापल्या गणातीला कामांचे प्रस्ताव समितीला सादर केले होते. परंतु योगिता वानखेडे,योगेश पाटील,माधुरी नेमाडे व प्रतिभा बोरोले,यांना एकही रुपया निधी मिळालेला नसून जुम्मा तडवी , दीपक पाटील अनिता चौधरी यांना फक्त प्रत्येक सात लाख रुपये निधी दिला गेलेला आहे ,या बाबत सदस्य योगिता वानखेडे यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे याना समितीतील कारभाराची माहिती दिली.
गटविकास अधिकाऱ्यांना घेतले फाईलावर–
रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांना सत्ताधारी सदस्यांसह सदस्यांनी जाब विचारला. तसेच दि.१४ जानेवारी रोजी काँग्रेसच्या सदस्य प्रतिभा बोरोले. यांचे पती तुकाराम बोरोले काँग्रेसचे सदस्य योगेश पाटील, शिवसेनेचा सदस्य रुपाली कोळी यांचे पती विश्वनाथ कोळी, भाजपाच्या अनिता चौधरीचे पती महेश चौधरीनी यांनी गटविकास अधिकारी यांना समान निधी वाटपा संदर्भात जाब विचारला असता निधी वाटपाचा अधिकार सभापतींचा आहे असे स्पष्ट करून आपणच गेल्या मिटिंग मध्ये हा असा आराखडा मंजूर केल्याचे सांगितले.
“निधी वाटपात मापात पाप”….असा वाटप केला गेला निधी–
पंचायत समिती सभापती कविता कोळी ३४ लाख, उपसभापती धनश्री सावळे ३१ लाख, सदस्य पी.के. महाजन ३० लाख व जितू पाटील ४१ लाख. या चौघांनी पक्षाच्या सदस्यांना ३० लाखाच्चावर निधी घेण्याचा प्रयत्न केला. भाजपाच्याच सदस्य अनिता चौधरी, जुम्मा तडवी, तसेच राष्ट्रवादीचे सदस्य दिपक पाटील यांना प्रत्येकी फक्त ७ लाख रु विकास निधि मिळाला आणि कॉग्रेसचे सदस्य प्रतिभा बोरोले, योगेश पाटील, भाजपाच्या सदस्य माधुरी नेमाडे, राष्ट्रवादी प्रवेश केलेल्या योगीता वानखेडे याना एकही रु निधी न देता परस्पर वाटप केल्याने इतर सदस्यांना डावलुन परस्पर मनमानी करत निधी लाटल्याचा गंभीर आरोप इतर सदस्यांनी केला.
…वेळीच निधी वाटपाचे बिंग फुटले नसते तर–
दोन दिवसापूर्वीच आपल्याला ठरल्या प्रमाणे निधी मिळालेला नसल्याचे बिग फुटले नसते तर सभापती व गटविकास अधिकारी यांच्या सह्या होवून मंजूर झालेला आराखडा कोणालाही न कळू देता जि प कडून मंजूर झाला असता. व आठ सदस्य निधी पासून वंचीत राहीले असते. परंतु वेळीच बिंग फुटल्याने उर्वरित आठ सदस्यांनी मनमानी कारभार समोर आल्याने आज पर्यन्त च्या चार पंचवार्षिक मध्ये विरोधी सदस्यांना सुद्धा समान निधी वाटपाच्या परंपरेला तिलांजली देण्यात सभापती उपसभापती सह दोन सदस्यां चा डाव फसला व या विषयी मनमानी पणाचा कळस गाठल्याची सदस्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
निधी न मिळालेल्या सदस्यांकडून आराखड्यावर आक्षेप–
रावेर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी कोणत्या सदस्याला किती निधी मंजुरीचा आराखडा असून त्यांची आकडेवारी सांगताच सभापती कविता कोळीचे पती हरलाल कोळी उपसभापती धनश्री सावळेचे पती संदीप सावळे सदस्य जितू पाटील यांनी चौघांनी ३० लाखाच्या वर निधी घेतल्याचे समोर आले. त्यावर उपस्थित सदस्यांनी मंजूर झालेल्या आराखडयावर आक्षेप घेऊन हा आराखडा आम्हा आठ सदस्यांना मंजूर नाही असे म्हणत निधी न मिळालेले सदस्य आक्रमक होत चार सदस्यांनी मनमानी करून निधी वाटप केल्याचा गंभीर आरोप केल्याने गटविकास अधिकारी यांनी येत्या सोमवारी सर्व सदस्यांची तातडीची बैठक बोलावाली असून निधी आपसात वाटपाचे पितळ उघडे पडल्याने सोमवारी होणारी पंचायत समितीची विशेष सभा चांगलीच गाजणार हे मात्र नक्की.. या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे..