रावेरला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना निवेदन
मुंजलवाडी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज, चंद्रकांत वैदकर। रावेर ग्रामीणरुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे रावेर ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्य जनतेवर उपचार होत असतात व गेल्या 20 वर्षापासून रावेरला उपजिल्हा रुग्णालय प्रस्ताविक असून आज पर्यंत झालेले नाही त्याचबरोबर रावेर येथे उपजिल्हा रुग्णालय विषयात आपण लक्ष घालून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून द्यावा त्याचबरोबर कायमस्वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी नियुक्ती करण्यात यावा जेणेकरून तालुक्याचा गोरगरीब जनतेच्या अडचणी सुटतील या संदर्भात निवेदन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन याना देण्यात आले
तसेच पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांना देखील निवेदन देण्यात आले 31 मे 2022 रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मुख्यतः अहिरवाडी व खानापूर सर्कल व तालुक्यातील हे भागातील शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यावेळेस जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मुंबई येथे
निवेदन देतांना भाजपा तालुका अध्यक्ष राजनभाऊ लासुरकर भाजपा कार्यकर्ता संदीपभाऊ सावळे पहूर गावचे सरपंच रामेश्वर पाटील आदी उपस्थित होते