भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर शौचालय घोटाळा, फरार मुख्य आरोपी सह आणखी एका आरोपीला अटक

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा तब्बल दीड कोटीच्या वर रावेर पंचायत समितीत शौचालय योजनेच्या अपहार प्रकरणातील फरार असलेला मुख्य संशयित आरोपी समाधान निंभोरे हा आज सकाळी रावेर पोलीसांना शरण आला आहे तर दुसरा संशयित विलास सावकारे याला
अजंदे गावातून पोलीसांनी अटक केली आहे. त्यांना रावेर कोर्टात हजर केले असता त्यांना ४ दिवसाची पोलिसकस्टडी देण्यात आली असून आता शौचालय योजनेच्या घोटाळ्यातील आरोपींची संख्या आठ वर पोहचली आहे.

रावेर पंचायत समितीत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गरीब कुटुंबाच्या शौचालय योजनेत तब्बल दीड कोटीच्या वर अपहार झाला होता. या प्रकरणी रावेर पोलिसात अडीच महीन्यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हे फरार होते. रावेर पोलिसांनी शौचालय योजनेचा टेक्निकल, तांत्रिक व मॅक्रो पध्दतीने तपास सुरु होता. या प्रकरणी काल रात्री उशिरा पंचायत समितीचे वरिष्ठ साहायक लेखाधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील, रविंद्र रामू रायपूरे, नजीर हबीब तडवी ,दोघे रा पाडळा बु, बाबुराव संपत पाटील रा. विवरे बुद्रुक ता. रावेर, रुबाब नवाद तडवी, हमीद महेमुद तडवी दोन्ही रा. पाडळा यांना अटक करण्यात आली आहे. आज सकाळी मुख्य आरोपी समाधान निंभोरे हा आज सकाळी रावेर पोलीसांना शरण आला तर दुसरा फरार असलेला आरोपी विलास सावकारे याला काडे देखील ताब्यात घेतले आज या दोघांना रावेर कोर्टात हजर केले असता त्यांना चार दिवसांची म्हणजे १२ तारखे पर्यन्त पोलीस कास्टडी देण्यात आली आहे.आतापर्यंत आरोपींची संख्या ८ वर पोहचली आहे.
मुख्य आरोपी समाधान निंभोरे यांच्याकडून काय महत्वाची माहिती मिळते,भ्रष्ट्राचारात आणखी कोण कोण पदाधिकारी वा अधिकारी सामील आहेत हा उलगडा होणार हे नक्की.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!