भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

रावेर शौचालय घोटाळा; आजी-माजी अधिकाऱ्यांसह सहा जणांना पुन्हा पोलीस कास्टडी, आणखी कोणकोण रडारवर!

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर पंचायत समिती अंतर्गत झालेल्या बहुचर्चीत शौचालय अनुदानात सुमारे दीड कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचार प्रकरणी लेखाधिका-यांसह सहा आरोपींना न्यायालयीन कस्टडी तर आजी-माजी विस्तार अधिका-यांसह सहा आरोपींना पुन्हा पोलिस कस्टडी वाढवुन मिळाल्याने आणखी कोनाकोणाची नवे उघड होतात या कडे सर्वांचे लक्ष लागून असून यात आणखी काही बडे मासे अडकणार असल्याची माहिती मिळत आहे .

रावेर पंचायत समितीत झालेल्या बहुचर्चीत शौचालय योजनेत अनुदानावर डल्ला मारत भ्रष्ट्राचार प्रकरणी या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार समाधान गोंडू निंभोरे ,यांचे सह सहाय्यक लेखा अधिकारी लक्ष्मण दयाराम पाटील,सहायक गट विकास अधिकारी दीपक संदानशिव सह बारा आरोपींना आता पर्यंत अटक करण्यात आलेली असून याना आधी पोलिसकस्टडी मिळाली होती आज सर्व बारा आरोपींना रावेर न्यायालयात हजर केले असता. रावेर न्यायालयाने गट समन्वयक समाधान निंभोरे सह गट विकास अधिकारी दिपक संदाशिव तत्कालीन विस्तार अधिकारी ग्राम पंचायत दिनकर सोनवणे, विलास सावकारे, महेंद्र गाढे, सतिष पाटील यांना पुन्हा दोन दिवसाची दि २२ पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे. यासह इतर आरोपी लेखाधिकारी लक्ष्मण पाटील,रविंद्र रायपुरे, बाबुराव पाटील नजीर तडवी, रुबाब तडवी, हमीद तडवी यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने सहा आरोपींना जळगाव रवाना करण्यात आले असून तब्बल दीड कोटी इतक्या मोठ्या आर्थिक भ्रष्ट्राचार प्रकरणात चौकशीत अजुन कोणकोण मोठे मासे गळाला लागणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!