भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

सावदा नगरीचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष रवींद्र विष्णू पाटील काळाच्या पडद्याआड

सावदा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज। रावेर तालुक्यातील सावदा येथील माजी नगराध्यक्ष सावदा नगरीचे शिल्पकार बाळासाहेब रवींद्र विष्णू पाटील ( वय ८७) यांचे आज २९ रोजी दुपारी १ वाजता पुणे येथे निधन झाले.त्यांची अंतयात्रा उद्या सकाळी १० वाजता सावदा येथील पाटील पुरा लहान मारुती जवळील राहत्या घरापासून निघेल.

रवींद्र पाटील यांनी अकरा वर्ष सावदा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद भूषविले त्यांचे कार्यकाळात सावदा शहरासाठी महत्वपुर्ण अशी सावदा शहरापासून १२ किलोमीटर अंतरावरील मांगलवाडी येथून तापीनदी वरील हातनूर धरणाच्या बॅकवॉटर मधून पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती, सन १९९५ मध्ये युती शासनाच्या काळात ३ कोटी ८४ लाख रकमेची ही कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या काळात त्यांनी शहरासाठी अनेक महत्वपुर्ण विकासकामे देखील केली, त्यांचे पश्चात सुपुत्र अमोल रवींद्र पाटील,पुतणे सतीश कुमार पाटील,मनोज कुमार पाटील असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!