महसूल विभागाची अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई,बलवाडी येथे तीन ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त
खिर्डी, ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील बलवाडी येथील सुकी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर-ट्रॉली महसूल विभागाने मध्यरात्री जप्त केल्या.
रावेर तालुक्यातील बलवाडी येथील सुकी नदीपात्रातून विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणारे तिन ट्रक्टर व ट्रॉली रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि १७ जुलै रोजी रात्री महसूल विभागाच्या पथकाने सापळा लाऊन केलेल्या धाडसी कारवाईत जप्त करण्यात आले,जप्त करण्यात आलेले ट्रक्टर-ट्रॉली पुढील कारवाई साठी रावेर तहसील कार्यालयात पाठवण्यात आले असून या पथकात तलाठी बलवाडी,मंडळ अधिकारी रावेर, मंडळ अधिकारी खिर्डी, मंडळ अधिकारी सावदा, मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल, तलाठी शिंगाडी, तलाठी गाते ,तसेच निंभोरा पोलिसस्टेशनचे api गणेश धुमाळ व पोलीस कर्मचारी याचा समावेश असून या कारवाईने बलवाडी परिसरातील अवैध वाळू वाहतुकदारामध्ये खळबळ उडाली आहे.