हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, ३० दरवाजे १ मीटरने उघडले
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी हतनूर धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडले.
जोरदार पावसामुळे हतनूर धरण क्षेत्रात हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली त्यामुळे आज गुरुवारी सकाळी हतनूर धरणाचे ३० दरवाजे १ मीटरने उघडले आहेत. हतनूर धरणातून ३९२०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.