भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथे महानुभाव पंथाचे संत संमेलन व भव्य दीक्षा सोहळ्याचे आयोजन

सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। प.पू.त. मीराबाईजी शेवलीकर सारोळा यांच्या सानिध्यात ब्रम्हविद्येचे धडे गिरवलेली श्री. पाराजी संताराम मिसाळ धोंडराई जि. बिड यांची सुकन्या धर्मकुमारी अपेक्षा उर्फ ताऊ ही आपल्या स्वइच्छेने अलकाताई मानेकर यांना निमित्त करून संन्यास धर्मात प्रवेश करीत आहे. याप्रसंगी श्रीपंचावतार उपहार
व अपूर्व भेटकाळ आयोजित करण्यात आलेला आहे यावेळी भव्य असे संत संमेलन देखील होणार असून दि ४ व ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सावदा येथे हा सोहळा होत आहे या सर्व कार्यक्रमास सावदा व परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून प्रसाद व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन दत्त मंदीर मठाधिपती आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर यांनी केले आहे

 या मंगलमय प्रसंगी पंथीय जेष्ठ श्रेष्ठ आचार्य, महंत संतगण, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे तरी आपण ही सहकुटूंब, सहपरिवार उपस्थित राहून संतदर्शन, ज्ञानश्रवण व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे
आवाहन सावदा येथिल श्री दत्त मंदिराचे मठाधिपती आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री यांनी केले आहे. कार्यक्रमाचे कार्यस्थळ कुलसूमबाई मंगल कार्यालय, सावदा हे राहील व आयोजक  मानेकर शास्त्री, सावदा म. कापुस्तळणीकर बाबा,फलटण म.उध्दवराज अण्णा मराठे, बांबोरी, मानेकर प्रतिष्ठेच्या सर्व शिष्यगाद्या समस्त मानेकर तथा पारिमांडत्य परिवारत अलकाबाई मानेकर तथा म. श्री कृष्णराजबाबा गुर्जर पांचाळेश्वर, सावदा ग्रामस्थ तथा पंचकोशीतील सद्भक्त मंडळी हे आहेत.

 कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार
दि. ४/११/२०२३ शनिवार, सकाळी ६ वाजतां श्रीमुर्तीस मंगलस्नान, अभिषेक, सकाळी ७ वा. श्रीमद् भगवतगीता पारायण, सकाळी ११ वा.श्री पंचावतार उपहाराचे यजमान श्री.डॉ.कुशल चुनीलाल अच्युत व अच्युत परिवारातर्फे श्री दत्त मंदीर संस्थान, सावदा येथे संपन्न होणार आहे. दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा, रात्री ८ वाजता भजन संकीर्तन होनार आहे व दि.०५/११/२०२३ रविवार प्रातःकाळी श्री दत्तात्रेय प्रभूंच्या पवित्र विशेषास मंगलस्नान अभिषेक, सकाळी ७ वा. श्रीमद्भगवतगीता पारायण, सकाळी ८ वा. भेटकाळ, सकाळी ८.३० वा. धर्मध्वजारोहन धर्मसभा, स्वागत,सकाळी ९ वा. दिप्रज्वलन, प्रास्ताविक सकाळी ११.०० वा. संन्यास दिक्षा विधी अध्यक्षीय विचार,
महाप्रसाद दणारी १ ते ३ वा

 हजारोच्या संख्येने संताची उपस्थिती
आचार्य बिडकर बाबा, आचार्य खामणेकर बाबा,आचार्य लासुरकर बाबा, आचार्य कारंजेकर बाबा, आचार्य दर्यापूरकर बाबा, आचार्य विद्वांस बाबा, आचार्य यक्षदेव बाबा, आचार्य शेवलीकर बाबा, आचार्य हलाशिकर बाबा, आचार्य राहेरकर बाबा, आचार्य सातारकर बाबा, आचार्य कोठी बाबा,आचार्य राजधर बाबा, आचार्य सुकेनेकर बाबा, महामंडलेश्वर सत्पंथाचार्य श्री जनार्दन हरीजी महाराज, आचार्य बाभुळगाव कर बाबा, आचार्य मराठे बाबा,आचार्य संतराज बाबा जम्मू, मुरारमल बाबा फगवाडा, कान्हेराज बाबा दिल्ली, सागर दादा अमृतसर, माधे राज बाबा खतौली, यांची उपस्थिति लाभणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!