गाते परिसरात अवैध दारू विक्री, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष
रावेर,मंडे टू मंडे न्युज विशेष प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील उदळी-गाते परिसरातील अनेक ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र दिसत असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे.
रावेर तालुक्यातील सावदा रेल्वे स्टेशन जवळील गाते येथे मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारची अवैध दारू विक्री सुरू आहे त्या मुळे तरुण दारुच्या आहारी गेल्याने अनेकांची कुटुंब उध्दवस्त होत आहे.तसेच या परिसरात अवैध दारू विक्री व्यवसाय मोठ्या जोमात सुरु असल्याने याकडे स्थानिक पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांची चांदी होत आहे.यासर्व प्रकाराला संबंधित विभाग जबाबदार असल्याची चर्चा सध्या दबक्या आवाजात सुरू आहे.तसेच परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करणार का?असा प्रश्न उपस्थित झाला असून या कडे परिसरातील सुज्ञ नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
दारुच्या अड्ड्या मधुन जेव्हा एखादा दारुड्या व्यक्ती जास्त प्रमाणात दारु पिऊन बाहेर पडतो तेव्हा तो धिंगाणा घालत त्याच्या तोंडून नको ते अपशब्द बाहेर पडतात. यामुळे महीला वर्गाला सुद्धा याचा जास्त प्रमाणात त्रास होत आहे. कारण हे संपूर्ण धंदे घरातूनच चालवले जात आहे . हे अवैध धंदे लोकवस्तीतले असल्या कारणाने तेथिल रहीवाशी तसेच शिक्षण घेत असलेल्या मुलांवरती याचा दुष परिणाम होत आहे.