भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

मागासवर्गीय समाजाच्या योजनांसाठी सरपंच परिषदेत सामील व्हावे -राजीव सवर्णे

ऐनपुर, मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। ग्रामपंचायतींमध्ये पन्नास टक्के आरक्षणामुळे बहुतांश ठिकाणी महिला पदाधिकारी कार्यरत आहेत.जळगाव जिल्ह्यासह राज्यातील मागासवर्गीयांसाठी राखीव जागांवर सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यरत असले तरी ते मुख्य प्रवाहात नाहीत,असे चित्र आहे.राखीव जागांवर निवडून गेलेल्या सदस्यांनी प्रभावी काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी महिला – पुरुष सरपंचांनी अखिल भारतीय सरपंच परिषदेत संघटित होवून काम करावे असे आवाहन सरपंच परिषदेचे अनुसूचित विभागाचे राज्य समन्वयक राजीव सवर्णे
यांनी केले आहे.

निंभोरा सिम (ता.रावेर) येथील माजी सरपंच आणि समता परिषदेचे अध्यक्ष राजीव सवर्णे यांची नुकतीच जळगाव येथे झालेल्या सरपंच परिषदेच्या चर्चासत्र कार्यक्रमात संघटनेच्या राज्य समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील आणि सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना येणाऱ्या अडचणी,विविध योजनांची अंमलबजावणी करतांना शासनाशी समन्वय साधणे, सरपंचांना न्याय मिळवून देणे आदीबाबत संघटनेचे काम सुरू आहे.

मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या अनेक योजना अद्याप सुद्धा शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही.त्यासाठी ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांना प्रशिक्षण कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून आयोजित
करण्याचे नियोजन असल्याची माहिती राजीव सवर्णे यांनी देवून अखिल भारतीय सरपंच परिषदेत अनुसूचित जातीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करून अधिक माहितीसाठी
9822059249 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे एका प्रसिद्धी पत्रान्वये कळवले आहे.

या वेळी अ.भा.सरपंच परिषदेच्या अनुसूचित विभागाचे प्रदेश समन्वयक म्हणून राजीव सवर्णे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,राज्य सरचिटणस विवेक ठाकरे, जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे,कालू मिस्तरी,निंभोरा सरपंच सचिन महाले,सिंगत सरपंच प्रमोद चौधरी, मुंजलवाडी सरपंच योगेश पाटील,अजनाडचे विजय महाजन,भोकरीचे अतुल पाटील आदी.उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!