ऐनपुर परिसरात खुलेआम सट्टा- मटका सुरू
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज, विजय के अवसरमल। ऐनपूर सह परीसरातील सुलवाडी, केळदा,निबोल, विटवा, सांगवे या गावा मध्ये खुलेआम सट्टा- मटका सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर गावात बसस्थानक परिसरातील पाच ते सहा टपऱ्यावर फक्त स्पेशल सट्टा – मटका खुलेआम सूर आहे. गावातील गजबजलेला भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या बस स्थानक परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरु आहे . सट्टा मटक्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू असून तसे पाहिले तर अवघ्या सात ते आठ कीलोमीटर अंतरावर पोलिसस्टेशन असल्यावर सुद्धा ऐनपुर परीसरात सट्टा मटका कसा सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.या सट्टा मटका मुळे अनेक लोकांचे संसार उद्धवस्त होत आहे.त्यामुळे सट्टा मटका कायम स्वरुपी बंद करण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
ऐनपूर येथील एव्हढ्या भर चौकात सट्टा मटका बिनधास्त सुरु आहे त्यांना कोणचा धाक वैगरे नाही का ? की, अर्थपूर्ण? संबंधातून हा सट्टा मटका सुरू आहे. असा प्रश्न नागरीक उपस्थित करत आहे. या बाबत वृत्त प्रसारित केले असता तात्पुरती सारवासारव केली जाते, व पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते, आजपर्यत प्रशासना कडून कोणतीही ठोस कारवाई का केली जात नाही ? तसेच सट्ट्या ची पीढी ऐनपूर गावांमध्ये सुरू असल्यावर सुध्दा या वर कोणत्याही प्रकारची आज पर्यंत झालीच नाही,यावर कार्यवाही होईल की नाही असा प्रश्न? उपस्थित केला जात आहे,सट्टा मटका कायम स्वरूपी बंद करावा अशी मागणी ऐनपूर सह परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.