अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महामार्गावर घेतला चालत्या ट्रकने पेट
बलवाड़ी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज. आशीष चौधरी। रावेर तालुक्यातील अंकलेश्वर – बऱ्हाणपूर या महामार्गावरील मोठा वाघोदा – सावदा दरम्यान रस्त्यावर श्रीकृष्ण पेट्रोल पंपा समोर रात्री १० वाजेच्या सुमारास ताग भरून जाणाऱ्यां चालत्या आयशर वाहनाला अचानक आग लागली.
पेट घेतलेल्या त्या वाहना मध्ये धागा (दोरा) होता ते वाहन बऱ्हाणपूर येथे दोऱ्याचे बंडल घेवून जात होते. तसेच सदर वाहनास आग लागल्याचे समजताच ड्राइवर ने गाडी थांबवुन उडी घेतली. आग आटोक्यात आणण्यासाठी सावदा येथील अग्नीशामक दलाकडुन आग विझवण्यासाठी दोन बंब मागविण्यात आले, सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. वाहनाला आग कशा मुळे लागली हे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.