पक्ष निष्ठेचे बक्षिस ; सावदा भाजप शहराध्यक्षपदी जे. के भारंबे यांची निवड जाहीर !
रावेर, मंडे टू मंडे वृत्तसेवा : येत्या काही महिन्यांवर पालिका निवडणुक होऊ घातली असतांना भारतीय जनता पार्टीची शहराध्यक्ष पदाच्या निवडीचे घोडे बऱ्याच दिवसांपासून अडकल्याचे पाहायला मिळत होते मात्र, आता शहराध्यक्ष निवडीचा नारळ फुटला असून “मंडे टू मंडे न्युज” च्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून भाजपच्या एकमेव महिला नगरसेविका सौ. रंजना भारंबे व त्यांचे पती जितेंद्र भारंबे (जे.के. भाऊ) यांच्या पक्ष निष्टेची पावती म्हणून अखेर जे.के भारंबे यांची सावदा शहराध्यक्ष पदावर वर्णी लागली असून या निवडीचे नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकरभाऊ महाजन, श्री.शिवाजीराव पाटील, ता.अध्यक्ष राजनभाऊ लासुरकर यांच्या हस्ते रावेर भाजप कार्यालयात देण्यात आले आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसें यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक मानले जाणारे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक यांनी भाजपला जय श्रीराम करत राष्ट्रवादी प्रवेश केला , यामुळे भाजपकडे एकमेव नगरसेविका म्हणून रंजना भारंबे या राहिल्या होत्या. भाजप शहराध्यक्ष पदी जे.के. भारंबे यांच्या नावाची वर्णी लागणार याबाबतची शक्यता “मंडे टू मंडे न्युज” ने आधीच वर्तविली होती,हे भाकीत खरे ठरले असून पक्ष निष्ठेचे बक्षीस,त्यांचा नागरिकांशी असलेले दांडगा जनसंपर्क, पक्षातील काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून जे.के.भारंबे यांच्या नावासाठी असलेला आग्रह, पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची केलेली कामे व नगरसेविका सौ. रंजना भारंबे यांना भाजप पक्षात राहण्याच्या त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे पक्षनिष्टेची पावती म्हणून त्याचे पती जे.के.भारंबे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदांची माळ टाकण्यात आली आहे. भारंबे यांनी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जनतेचे कामे केली असून त्यांनी तालुका संयोजक तसेच सावदा शहर संयोजन म्हणून बजरंग दलाच्या माध्यमातून सामाज्यातील लोकांची कामे केली आहे.
निवडी संदर्भात जे. के. भारंबे यांनी बोलतांना सांगितले, भाजप सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. भाजपमध्येच कार्यकर्ता नेता होऊ शकतो. भाजप देशातीलच नव्हे तर, जगातील सर्वांत मोठा पक्ष असून या पक्षाचे ११ कोटी सदस्य आहेत. शहरात पक्षाचा आणखी विस्तार करायचा आहे. लोकांच्या हितासाठी पक्षविस्तार महत्वाचा असून, पालिकेत पुन्हा सत्ता आली पाहिजे. एकटा मीच अध्यक्ष नसून, सर्व कार्यकर्तेच अध्यक्ष आहेत. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीचा अवलंब करून या पदावर काम करत जनसेवेसाठी सदैव कटीबद्ध आहे,’ असे भारंबे यांनी स्पष्ट केले.
श्री.जे.के भारंबे सावदा यांच्या नवाची निवड करण्यात आली तसे नियुक्ती पत्र जिल्हा उपाध्यक्ष श्री.पद्माकरभाऊ महाजन, श्री.शिवाजीराव पाटील, ता.अध्यक्ष राजनभाऊ लासुरकर यांनी रावेर भाजप कार्यालयात येथे दिले. निवडीनंतर जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आ.श्री. गिरीशभाऊ महाजन,भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे,रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.रंजनताई पाटील,भाजपा किसान मोर्चा चे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री.सुरेशभाऊ धनके, जिल्हा उपाध्यक्ष श्री.नंदकिशोर महाजन,श्री.प्रल्हादभाऊ पाटील यांनी फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच कार्यालयात उपस्थित जिल्ह्या उपाध्यक्ष श्री.पद्माकरभाऊ महाजन,मा.संगायोचे अध्यक्ष श्री.शिवाजीराव पाटील,तालुका अध्यक्ष श्री.राजनभाऊ लासुरकर, तालुका सरचिटणीस श्री.महेशभिऊ चौधरी, श्री.सि.एस.पाटीलसर,माजी सावदा शहराध्यक्ष श्री.परागभाऊ पाटील,बेटी बचाव बेटी पढाव च्या जिल्हा संयोजिका सारिका चव्हाण, गजानन भार्गव, संतोष परदेशी, अतुल ओवे या सह कार्यकर्त्यांनी रावेर कार्यालय येथे त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.