सावदा रेल्वेस्टेशन प्रबंधकाचा भुसावळच्या तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल
सावदा,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून सलगी करत लग्न करण्याचा बहाण्याने भुसावल शहरातील तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रावेर तालुक्यातील सावदा येथील रेल्वेस्टेशनचे प्रबंधक अंकुश किरण मोरे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भुसावल शहरातील एका २९ वर्षीय तरुणीला तुला रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखवत त्या नंतर तरुणीशी अधिक संबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे आमिष दाखवून दी.३१ मार्च २०१८ या दिवशी भुसावल शहरातील जळगाव रोडवरील लोणारी हॉल जवळ तरुणीला बोलावून तेथून तिला त्याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्याने तरुणीला नोकरी तर लावून दिलीच नाही ,तरुणीने त्यास लग्न करण्याचा तगादा लावला असता त्याने लग्नास स्पष्ट नकार दिल्याने तरुणीने भुसावल शहर पोलिसस्टेशनला सवादा रेल्वे स्टेशन प्रबंधक अंकुश किरण मोरे,रा.गणेश कॉलनी,मरीमता मंदिरा मागे,भुसावल याचे विरोधात तक्रार दिल्याने रविवारी भुसावल शहर पोलिसस्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट हे करीत आहेत.