भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

गुंगीचे औषध देवून तरुणीची दोन लाखात विक्री

रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। एका तरुणीला मध्यप्रदेशात दोन लाखात विकून जबरजस्ती तिचा विवाह तरुणाशी करून दिल्याची घटना रावेर तालुक्यातील पाल येथील तरूणीशी घडली.

रावेर तालुक्यातील पाल येथील एका २५ वर्षीय तरुणीला दोन अनोळखी महिलांनी नाश्त्यामध्ये गुंगीचे औषध देवून मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्हातील घाटपिपल्या येथील राकेश वर्मा वय ३० या तरुणाला दोन लाख रुपयांना विक्री करून जबरजस्तीने तिचा विवाह त्या तरुणाशी लावून दिला ,त्या नंतर राकेश वर्मा याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला व तरुणांची आई ,वडील,दोन भाऊ,बहीण यांनी पीडितेला डांबून ठेवत तिला मारहाण केली या संदर्भात पीडित तरुणीने आठ जणां विरुद्ध तक्रार केल्याने
पिडीतीची सासू शामू वर्मा, सासरे भगिरत वर्मा, दिर कमल वर्मा दुसरा दीर ,व इतर कुटुंबासह दोन अनोळखी महिलांविरुध्द रावेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!