खळबळजनक ; शेतकऱ्यांच्या नावावर केळी पीक विम्याची कोट्यावधी रुपयाची रक्कम हडप !
सावदा ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यात केळी पीक विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम दुसऱ्याच्या नावावरील शेती काही केळी उत्पादक शेतकऱ्यांना न सांगता त्यांच्या नावावर बोगस दस्तऐवज तयार करून केळी पिक विमा मंजूर करून घेत रकमा हळपल्या असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
रावेर तालुक्यांतील वडगाव, जानोरी, चीचाटी, जिन्सी, आभोडा सह तालुका भरातील कोचुर परिसरातील काही लोकांनी तालुक्यातील आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्यावर काही केळी उत्पादक शेतकऱ्यांना न सांगता त्यांच्या नावावर बोगस दस्तऐवज तयार करून केळी पिक विमा मंजूर करून घेतले. केळी पीक विम्याचे करोडो रुपये हळपल्या ची खात्रीलायक माहिती मिळत आहे. रावेर तालुक्यातीलच वडगाव शेत शिवारातील शेती उताऱ्याला बोगस कागदपत्रे जोडून लाखो रुपये केळी पीक विम्याच्या नावाखाली हडप केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. तसेच अशी तालुका भरात बरीच प्रकरणे असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच फैजपूर येथील शेतकऱ्यांच्या कोचुर शिवारात असलेल्या शेतीवरील शेती उताऱ्यावर बनावट दस्ताअवज देत पीक विम्याचे करोडो रुपये हळपले आहेत, त्याच प्रमाणे चिनावल, कुंभारखेडा, विवरा, रावेर अशा अनेक गावातील रावेर तालुकाभरात अनेक ठिकाणी बोगस कागद पत्रे तयार करून पिकविम्याचे मोठ्याप्रमाणावर रकमा हडप केल्या आहेत.
केळी पिक विमा मंजूरिच्या प्रक्रियेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट करारनामे, बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या उद्योगात काही संबंधित तलाठी यांनी बनावट सातबारा उतारे तयार करून शेतामध्ये केळी पीक प्रत्यक्ष नसताना केळी पिकाची नोंद करून केळी पीक विमा काढणाऱ्या यंत्रणेला सहकार्य केले, त्यानंतर या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसताना त्यांच्या नावावर केळी पीक विम्याची रक्कम हडप करण्यात आली तर काही शेतकऱ्यांना केळी पीक विमा मंजूर करण्यासाठी काही मध्यस्थी दलालांनी मोठमोठ्या आर्थिक रकमा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली. केळी पीक विमा प्रकरणांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर शंभर रुपयाचे स्टॅम्प कोणाच्या नावावर आणि कोणी दिले आणि कोणाच्या स्वाक्षरीने दिले हा प्रश्न सुद्धा रावेर तालुक्यात उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या केळी पिक विमा योजनेत कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत संबंधित काही तलाठी, कृषी खात्याशी संबंधित कर्मचारी, काही स्टॅम्पवेडर, ऑनलाइन काम करणारी यंत्रणा, काही अधिकारी, विमा कंपनीचे एजंट आणि विमा कंपनीशी संपर्कात असणारे मध्यस्थी दलाल कोण कोण सक्रिय होते आणि आहेत..? ही रक्कम कोणी हडप केली? कोणी दुसऱ्याच्या नावावरील शेतीच्या उताऱ्याला शेतकऱ्याला माहिती न करता आपले व नातेवाईकांचे नावे लाखो रुपये हडप केले? यांची चौकशीची मागणी केली जात आहे…..तूर्त एव्हढेच?