दसनूर येथे शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह
निंभोरा,ता.रावेर, प्रा.दिलीप एस सोनवणे। रावेर तालुक्यातील दसनूर येथे 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर पर्यंत शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.
यां वेळी कथा वाचक म्हणून ह .भ. प पुरुषोत्तम महाराज मडाखेड हे सकाळी 9 ते 12 व दुपारी 2.30 ते 5 वाजे पर्यंत शिव महापुराण कथा वाचन करणार आहे . तसेच रोज दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 6 काकडा आरती व संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ व रात्री 8 ते 10 किर्तन तसेच बुधवार तुकाराम महाराज ईलोरा , गुरुवार नारायण महाराज निंभोरा, शुक्रवार शिवदास महाराज खेडी पानेरा , शनिवारी समाधान महाराज रेंभोटा, रविवार नारायण महाराज भांमलवाडी , सोमवार ज्ञानेश्वर महाराज शेलवड, मंगळवार रमेश महाराज सुसरी , बुधवार पुरुषोत्तम महाराज मडाखेड यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन होईल. व 11 ते 3 महाप्रसाद व तसेच संध्याकाळी 6 ते 9 दिंडी सोहळा गावातील व पंचक्रोशातील ग्रामस्थांनी शिवमहापुराण कथेचा व कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आयोजक उमेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट व भजनी मंडळ दसनूर यांनी सांगितले आहे. तसेच गावातील भजनी मंडळ व बाहेरील गावातील भजनी मंडळनी दिंडी सोहळ्या मध्ये उपस्थित राहावे असे आयोजक यांनी सांगितले आहे.