दसनूर येथे उद्यापासून शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी। दसनूर ( ता. रावेर ) येथील उमेश्वर महादेव मंदिरा मध्ये उदया मंगळवार दि.२७ पासून संगीतमय शिवमहापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे दि २७ डिसेंबर ते ३ जानेवारी दरम्यान होत आहे.
दैनंदीन कार्यक्रम सकाळी ५ ते ६ काकडा आरती, पारायण, दुपारी १२ ते ४ शिवमहापूराण कथा, संध्याकाळी ५ ते ६ हरीपाठ,रात्री ८ ते १० कीर्तन अशी कार्यक्रमावली असून
दि २७ मंगळवारी भगवान महाराज (सातगांव ),
दि २८ बुधवारी पंकज महाराज ( खडकोद म.प्र. ),दि.२९ गुरूवारी अंकुश महाराज ( मनवेल ),दि.३० शुक्रवारी पुंडलिक महाराज ( चिखली ), दि.३१ शनिवारी भरत महाराज ( म्हैसवाडी ), दि.१ रविवारी नारायण महाराज ( भामलवाडी ),दि.२ सोमवारी समाधान महाराज ( भोजेकर ), दि.३ मंगळवारी समाधान महाराज ( भोजेकर ), यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
तसेच मंगळवारी ११.३० ते ३.३० महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. शिवमहापुराण वाचक निरंजन महाराज ( वसुर,ता.मुखेड) आहेत.गायक- प्रज्ञानंद महाराज,कृष्णा महाराज,तबला- जितेंद्र महाराज, हार्मोनियम- प्रजीत महाराज, झाकी सजावट-गोपाल शास्त्री, गायनाचार्य-नामदेव महाराज, रामभाऊ महाराज, गोपाल महाराज, मृदंगाचार्य-मुकूंदा महाराज,विणेकरी-रविंद्र चौधरी, गोपाल पाटील, सोपान कोळी, गोविंदा बोरसे आहेत. कार्यक्रमास उमेश्वर भजनी मंडळी दसनूर, सिंगनूर, इंदिरानगर, आंदलवाडी, निंभोरा, खिर्डी,ऐनपूर,निंबोल यासह परिसरातील भजनी मंडळ,समस्त ग्रामस्थ मंडळी दसनूर,सिंगनूर यांचे सहकार्य लाभत असून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.