भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

धक्कादायक : तहसीलदारांच्या अंगावर वाळू माफियांकडून जेसीबी घालण्याचा प्रयत्न, रावेर मधील घटना

रावेर, ता.रावेर. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर तालुक्यातील भोकर नदीपात्रातून अवैध वाळू व गौणखनिज उत्खनन रोखण्यासाठी रात्रीच्या सुमारास गेलेले प्रशिक्षणार्थी तहसीलदारांच्या अंगावर वाळू माफियांकडून जेसीबी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पातोंडी शिवारात घडली आहे.

रावेर येथील प्रशिक्षणार्थी तहसीलदार मयूर कळसे यांच्यावर हा हल्ला झाला असून त्यांनी फिर्याद दिली आहे. दि. ११ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास मंडळ अधिकारी जनार्दन बंगाळे, यासिन तडवी, विठोबा पाटील, गजेंद्र शेलकर व कोतवाल प्रविण धनके या आपल्या सहकार्‍यांसह ते वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी पातोंडी शिवारातील नदीपात्रात गेले होते. याप्रसंगी अवैध गौण खनिज उपसा व वाहतुक करणारे (एमएच १९ डीव्ही ३७३९) क्रमांकाचे जेसीबी तसेच (एम एच १९ ईए १३११) क्रमांकाचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर तसेच ट्रॉलीसह व विना क्रमांकाचे अवैध वाळूने भरलेले एक स्वराज कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाहन यांच्यावर जप्तीची कारवाई त्यांनी सुरू केली. ही कारवाई सुरू असतांना मोहन बोरसे याला महसूलच्या पथकाने त्याचे जेसीबी हे तहसील कार्यालयात नेण्याचे सांगण्यात आले. मात्र त्याने जेसीबी मयूर कळसे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते सतर्क असल्याने बाजूला झाल्यामुळे अनर्थ टळला. तर तो भरधाव वेगाने जेसीबी घेऊन पळून गेला. तसेच यासोबत एक ट्रॅक्टरचा चालक देखील आपले वाहन घेऊन पळून गेला.

दरम्यान, मनोज दशरथ बोरसे याने विना क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळूने भरलेले कारवाईसाठी तहसिल कार्यालय रावेर येथे घेऊन येत असताना पातोंडी गावाजवळ ट्रॅक्टर जोरात घेऊन खिरवड गावाच्या दिशेने घेऊन गेला. त्यास सरकारी अधिकारी विठोबा पाटील यांनी त्यांची गाडी तिरपी करुन थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु तो न थांबता त्यांचे वाहनाला कट मारुन जोरात घेऊन गेला. ट्रॅक्टर वर बसलेले गजेंद्र शेलकर यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने धक्काबुक्की करुन त्यांचा चष्मा फोडुन नुकसान करुन मोबाईल खाली पाडला व त्यांना ट्रॅक्टरवरुन खाली ढकलुन पळुन गेला.

मयूर कळसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहन बोरसे, मनोज बोरसे यांच्यासह ६ ते ७ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शाम साहेबराव पाटील (वय २७), कल्पेश दौलत धनगर (वय २७), सुनील श्रावण धनगर (वय ४४ सर्व रा. पातोंडी ता. रावेर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या बाबत रावेर पोलिसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!