मांगलवाडी- लूमखेडा परिसरात प्रथमच बिबट्या चे दर्शन
बलवाड़ी,ता.रावेर, प्रतिनिधी।रावेर तालुक्यातील बलवाडी येथून जवळच असलेल्या मांगलवाडी व लूमखेडा शिवारात काल रात्री आठ वाजे दरम्यान बिबट्या चे दर्शन झाले.परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.
सविस्तर वृत्त असे की तांदलवाडी येथून हतनूर धरण रस्त्याने जातांना वाटेत मांगलवाडी व लूमखेडा अश्या दोन गावांची शीव लागते. शुक्रवारी दि २९ रोजी रात्री आठ वाजे दरम्यान धरणाकडून तांदलवाडी मार्गे वाघाडी ता. रावेर येथील शुभम पाटील, स्वप्नील पाटील, बाळू पाटील, कुंदन कोळी हे आपल्या खाजगी वाहनाने घरी जात असतांना त्यांच्या तवेरा वाहनसमोरून जवळपास पंधरा फूट लांब उडी मारून गव्हाच्या शेतात बिबट्या निघून गेला.पूर्ण वाढ झालेला असा तो बिबट्या असल्याचे त्यांनी सांगितले तसेच सांगितलेल्या ठिकाणी पाहणी केली असता खरोखरच पायाचे ठसे आढळून आले. ठस्यांचे फोटो रावेर वनक्षेत्राचे वनपाल रविंद्र सोनवणे यांना दाखविले असता ते ठसे एखादया वेळेस तडसाचे पायाचे ठसे असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. परन्तु प्रत्यक्ष पहाणाऱ्या नी तो बिबट्याचं असल्याचे सांगितले, या बाबत चौकशी करण्याचेही त्यांनी सांगितले, परिसरातील शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहावे व रात्री उशिरापर्यंत शेतात थांबू नये.गरज असल्यास एकापेक्षा जास्त व्यक्ती ने राहावे व बॅटरी चा वापर करावा. आक्षेपार्ह पायाचे ठसे आढळून आल्यास त्वरित संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.