भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपुर येथे “आमचा गाव आमचा विकास” अंतर्गत विशेष ग्राम सभा संपन्न

ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के.अवसरमल।ऐनपुर येथे आमचा गाव आमचा विकास अंतर्गत १५ वा वित्त आयोगातून सन २३ – २४ बाबत विकास कृती आराखडा तयार करण्यासाठी ग्राम पंचायत मध्ये विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले या सभेचे अध्यक्ष सरपंच अमोल महाजन होते .

ग्राम विकास अधिकारी सुनील गोसावी यांनी १५ वा वित्त आयोगाच्या निधी बाबत माहिती दिली. त्यानी सांगीतले की ६० % निधी हा बांधित राहील हा निधी फक्त आरोग्य व पिणी पुरवठा याच्या वर खर्च केला जाईल व बाकी ४० % अ बांधित निधी इतर कामा साठी खर्च केला जाणार आहे . त्या निधीतुन वार्डातील कामे केली जाणार आहे गटारी शौचालय, काॅंकरेट रस्ते, पेव्हेर ब्लॉक बसवणे याची कामे केली जाणार आहे असे ग्राम सेवक यानी सांगीतले तसेचे प्रत्येक वार्डतील नागरीकानी समस्या मांडल्या व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन सरपंच अमोल महाजन यांनी दिले या विशेष ग्रामसभेत बाजाराच्या बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंती ऐवजी त्याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यात यावे व हतनुर प्रकल्पात फुगोट्याच्या पाण्यामुळे पुनर्वसन विभागाने भुसंपादित केलेल्या शेतजमीन ग्रामपंचायत ने ताब्यात घेऊन त्यापासून ग्रामपंचायत ला महसूल मिळणार आहे असे लेखी अर्ज प्राप्त झाले आहे या विषयावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सरपंच अमोल महाजन यांनी सांगितले

आजच्या ग्रामसभेला सरपंच अमोल महाजन, उप सरपंच रुपाली पाटील, किशोर पाटील, राजेश पाटील, पंकज पाटील, अनिल कोळी, प्रियंका पाटील, रंजना जैतकर, दिपाली महाजन,वंदना महाजन, बबलु अवसरमल, पुथ्वीराज कोळी, शे शफी, विजय अवसरमल, अनिल आसेरकर ,. जानेश्वर महाजन, इकबाल पिंजारी, अरविंद महाजन,निलेश कोळी, प्रकाश भिल्ल,सुरेश कोळी,जितु कोळी, मोहन कचरे, तसेच प्रत्येक विभागातील कर्मचारी उपस्थित होते व ग्राम पंचायत कर्मचारी व मोठ्या प्रमाणावर नागरीक उपस्थित होते .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!