भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

सावदा पोलिसस्टेशन हद्दीत खिरोदा, सावखेडा, चिनावल, कुंभारखेडा सह परिसरात सट्टा जोमात

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्हाभरात अवैध धंद्यां विरुद्ध एव्हढे रान उठत असताना सावदा पोलिसस्टेशन हद्दीत खिरोदा, सावखेडा, चिनावल, कुंभारखेडा परिसरात सट्टा जोमात सुरू असून अवैध सट्टा-मटका व्यवसायाने जोर धरला आहे, या परिसरात गावोगावी खुलेआम सट्टा बिटींग घेतली जात असून पोलीस बघ्याची भूमिका का घेत आहेत? आम्ही वरपर्यंत हप्ता देतो आम्ही का बंद करायचा? असा प्रश्न सट्टा पेढी वाल्यांकडून केला जात आहे.

माजी मंत्री आ.एकनाथ राव खडसे यांनी या बाबत विधानसभेत आवाज उठविला होता तसेच जळगाव येथील एका बैठकीत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे समोर याबाबत पाढाच वाचला होता, त्या वेळी कारवाई करण्याचे आदेश दिले होते तरीही सट्टा-मटका बंद झालेला तर नाहीच पण सट्टा-मटका जोमाने सुरूच आहे.

रावेर तालुक्यातील सावदा पोलिसस्टेशन हद्दीत सावखेडा येथे गेल्या अनेक वर्षांपासून पिढी जात सट्ट्याची पिढी बिनधास्त पणे सुरू असून या सट्ट्याच्या पिढी मार्फत सावखेडा खु, सावखेडा बु, खिरोदा, कळमोदा, रोझोदा, चिनावल, कुंभारखेडा, लोहारा, जानोरी, चीचाटी , गौरखेडा सह परिसरातील आदी गावांमध्ये सट्टा पट्टीची दुकाने मांडली आहेत,

या गावांमध्ये एजंट टपऱ्यावर सट्टा घेण्याचे काम करतात काही टपऱ्या तर फक्त स्पेशल सट्टा-मटकाच लिहिण्याचे काम करतात. सावदा पोलिसस्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी त्यांच्या समोर सट्टा पेढी व ही सट्टा मटक्याची खुलेआम चालणारी अवैध दुकाने बंद करण्याचे आव्हान उभे असून ते कायमचे बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. सावदा पोलिस यावर कारवाई करतील काय? काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरेल?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!