भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

मुंजलवाडी येथे श्री संगीतमय शिवमहापुराण व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह

मुंजलवाडी,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, चंद्रकांत वैदकर। रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे श्री संगीतमय शिव महापुराण व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला प्रारंभ झाला असून या सप्ताहाचे हे 15 वे वर्ष आहे. या संगीतमय शिव महापुराण कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचे कथावाचक ह.भ.प. गोकुळ महाराज खिरवड ता. रावेर जिल्हा जळगाव हे आहे.

हा सप्ताह प्रारंभ माघ शु.5 वसंत पंचमी दिनांक 26 जानेवारी 2023 गुरुवार ते सांगता मिती माघ शु.बारस दिनांक 02 फेब्रुवारी 2023 गुरुवार पर्यंत असून या सप्ताहाचे मार्गदर्शक ह.भ.प. श्री कांतिलाल बाबा महाराज रावेर हे आहे. या सप्ताहाचे दैनंदिन कार्यक्रम काकडा आरती सकाळी 5 ते 6, श्रीमद शिव महापुराण कथा सकाळी 9 ते 12, दुपारी 12 ते 4, हरिपाठ संध्याकाळी 6 ते 7, हरीकिर्तन रात्री 8 ते 10. या सप्ताह काळात वेगवेगळया कीर्तनकारांचे कीर्तन ठेवलेले आहे. दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार ह.भ.प. काशीराम महाराज सातळीकर यांचे कीर्तन, दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी शुक्रवार ह.भ.प. समाधान महाराज निमखेडी यांचे कीर्तन, दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी शनिवार ह. भ. प. पूजा दीदी महाराज भुसावळ यांचे कीर्तन,

दिनांक 29जानेवारी 2023 रोजी रविवार ह. भ. प .हनुमंत महाराज धुळे यांचे कीर्तन, दिनांक 30जानेवारी 2023 रोजी सोमवार ह.भ.प. रामेश्वर महाराज(गायन अलंकार)नाशिक यांचे कीर्तन, दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी मंगळवार ह.भ.प. दीपक महाराज(मुक्ताई संस्थान) निंभोरासिंम यांचे कीर्तन, दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी बुधवार ह.भ.प. परमेश्वर महाराज पाळधी यांचे कीर्तन असे दैनंदिन कीर्तनाचे कार्यक्रम आहे.

या सप्ताहासाठी मृदंगाचार्य -ह.भ.प श्री अंकुश महाराज , आळंदी . ह.भ.प श्री लक्ष्मण महाराज मुंजलवाडी , ह.भ.प श्री गणेश महाराज मुंजलवाडी , ह .भ.प श्री शुभम महाराज मुंजलवाडी ,हार्मोनियम- ह.भ.प श्री गोलू महाराज पूनखेडा ,ह भ प श्री अर्जुन महाराज मुंजलवाडी ,ह भ प श्री संतोष महाराज मुंजलवाडी ,ह भ प श्री आधार महाराज मुंजलवाडी , गायनाचार्य- ह भ प श्री काशिनाथ महाराज सातळीकर ,ह भ प श्री गिरी महाराज गोडेगांव ,ह भ प श्री बळीराम महाराज रावेर ,ह भ प श्री मधुकर महाराज बेलुरा .
ढोलकी व सांभळ वादक- ह भ प श्री निलेश महाराज मुंजलवाडी ,ह भ प श्री आशिष महाराज मुंजलवाडी ,
विणेकरी- ह भ प श्री विठ्ठल महाराज पांडे ,ह भ प श्री ओंकार महाराज धुळे ,


पंचक्रोशीतील भजनी मंडळ
रावेर रमजीपुर रसलपुर खिरोदा शिंदखेडा उटखेडा भाटखेडा सावखेडा पातोंडी पुनखेडा कुसुंबा तामसवाडी
या सप्ताहाचा दिंडी सोहळा दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी गुरुवार सकाळी 8ते 11या वेळेत आहे. काल्याचे किर्तन दुपारी 11 ते 1 या वेळेस ह.भ.प. डॉ विनीत कुमार महाराज आडगाव यांचे दणदणीत काल्याचे किर्तन आहे व त्यानंतर महाप्रसाद 1 ते 5 वाजे पर्यंत आहे. या कार्यक्रमाला समस्त नवंयुवक व ग्रामस्थ अनमोल सहकार्य करत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!