खिर्डी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या वतीने पीक कर्ज मेळावा संपन्न
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। भारतीय स्टेट बँक निंभोरा स्टेशन शाखा व ग्राम पंचायत खिर्डी बू तर्फे पीक कर्ज मेळावा आयोजित करण्यात आला, ह्या मेळाव्याला उपस्थित शेतकरी बंधूंना नविन पीक कर्ज नूतनीकरणाचे फायदे शेतीविषयी इतर कर्ज योजनेची माहिती देण्यात आली तसेच प्रधानमंत्री पीक विमा जीवन सुरक्षा योजने बद्दल माहिती देण्यात आली .
सभेला उपस्थित काही शेतकऱ्यानी मांडलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देण्यात आले तसेच उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना पीककर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान करण्यात आले खिर्डी बु ग्रामपंचायत जवळ दि.23/06/2022 गुरुवार रोजी संध्याकाळी आयोजित केलेल्या मेळाव्याला बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित होती या वेळी योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन स्टेट बँकेचे राधेश्याम सर यांनी केले होते या मेळाव्याला सर्व शेतकन्याकडून उत्तम प्रतिसाद मिळाला ह्या मेळाव्याला खिर्डी बु चे सरपंच पोलिस पाटील शेतकरी उपस्थित होते ह्या कार्यक्रमाचे अथक परिश्रम बॅक शिपाई यांनी केले.