अवैध धंदे बंद करा ; लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे
रावेर,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क । रावेर तालुक्यातील खानापूर येथील अवैध धंदे बंद होण्यासाठी निवेदन दिले होते परंतु निवेदन देवूनही पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नव्हती म्हणून दि १६ जानेवारी रोजी पन्हा खानापूर येथील संजय काशिनाथ कोळी यांनी निवेदन देऊन निवेदनात दिनांक २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचे नमूद केले होते परंतु या दहा दिवसा मध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणाकडे गांभीर्याने विचार केला नाही.
अखेर दिनांक २६ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू असलेले आमरण उपोषणाची दखल घेऊन अवध्या चार तासांच्या आत रावेर स पो नि आशिषकुमार अडसूळ यांनी लेखी आश्वासन देऊन आमरण उपोषण थांबवावे अशी विनंती केली अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आमरण उपोषण संजय काशिनाथ कोळी यांना भारतीय जनता पक्षाचे तालुका हा अध्यक्ष राजन लासुरकर यांनी लिंबू पाणी देवून उपोषण सोडविण्यात आले.
या वेळी सपोनि आशिषकुमार आडसुळ, पुरुषोत्तम पाटील,राजू करोडपती, संदिप सावळे, शामराव महाजन, भास्कर चंदनकर, धनराज धांडे, दिवाकर पाटील,विलास चौधरी, छोटू जहागीरदार, बाळू भारंबे,शे शकिल योगेश्वर महाजन, धनराज चौधरी, कुंदन चौधरी, गोलू धनगर, सुहास धांडे, जितु पाटील, हर्षल महाजन,पप्पु सोनवने, गोकुळ महाले,जितु चौधरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते