खिर्डी – ऐनपुर परिसरातील अवैध धंदे बंद करा
ऐनपुर,ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपुर व परीसरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर यांनी रावेर तहसिलदाराना निवेदन दिले, अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना तहसीलदारांकडे निवेदन तक्रार द्यावी लागते ही सुसंस्कृत महाराष्ट्रातील शोकांतीका आहे,
सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील खिर्डी, ऐनपुर परीसरात काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या आशिर्वादाने मोठ्या प्रमाणावर सट्टा, पत्ता,गावठी दारू,देशी विदेशी दारू, अवैध पणे सर्रास सुरू असून या दहा ते बारा गावातील अवैध धंद्य्यावाल्यांना या गावचे बीट हवालदार पध्दतशीरपणे हाताळत आहेत त्याबद्दल शासनाने त्यांना एखाद्या पुरस्कार द्यायला हवा ज्यांच्या आशिर्वादाने हे अवैध धंदे सुरू आहेत हे धंदे बंद न झाल्यास गावकरी मंडळी गांधीगिरी च्या मार्गाने त्यांचा सत्कार करणार आहेत यात काही विपरीत घटना घडल्यास यास पोलिस कर्मचारी जबाबदार राहणार या आशयाचे निवेदन ऐनपुर येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर यांनी रावेर येथील तहसिलदार यांना दिले आहे या अवैध धंदे बाबत तक्रारी होऊनही पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं, यात कुठे पाणी मुरतंय ! पोलिस प्रशासन अवैध धंदेवाईकांशी काही आर्थिक संबंध तर जोपासत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.