निंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे तत्काळ बंद करा- वंचित बहुजन आघाडी
ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज,प्रतिनिधी। तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनला परिसरातील ऐनपुर, खिर्डी, तांदलवाडी या गावातील सट्टा, पत्त्यांचे अड्डे, देशी दारू, हातभट्टी या सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबतचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्या देण्यात आले.
रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्टेशनला वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने निंभोरा पोलीस स्टेशन परिसरातील ऐनपुर, खिर्डी, तांदलवाडी या गावातील सट्टा , पत्त्यांचे अड्डे , देशी दारू, हातभट्टी या सर्व अवैध धंदे बंद करण्याबाबतचे निवेदन वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष वंदनाताई सोनवणे जिल्हा महासचिव वंदनाताई आराक रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे यांच्या नेतृत्वाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे ए.पी.आय हरिदास बोचरे याना देण्यात आले.
या वेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे. जिल्हा महासचिव वंदनाताई आराक, माजी. जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, माजी. जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर,वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळु शिरतुरे , महिला आघाडी ता. सायरा कोचुरे रावेर ता. महासचिव कांतीलाल गाढे, सलीम शहा यासीन शहा, कंदर सिंग बारेला, ज्ञानेश्वर तायडे, कैलास तायडे, पंकज तायडे ,मनोहर तायडे संजय कोचुरे ,ललिता कोचुरे, आशा जाधव ,पल्लवी कोळी ,सुनिता पवार शोभा बिराडे ,गुंफाबाई वाघ, रेणुकाबाई भिल ,सुरेखा आदीवाल. बहुसंख्य महिला ,पुरुष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी फैजपुर, पोलीस अधीक्षक जळगाव ,तसेच मुंबई मंत्रालयापर्यंत पाठविण्यात आले आहे.