रावेर येथे प्रहार दिव्यांग संघटनेचे लाक्षणिक उपोषण
तासखेडा, ता.रावेर, मंडे टू मंडे न्युज, अनिल इंगळे। रावेर येथे पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात रावेर तालुका दिव्यांग संघटनेचे लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले असून रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधील ग्रामसेवकांनी सन २०१६ च्या GR नुसार २०१६ ते २०१८ दरम्यान ३% निधी तसेच २०१८ ते२०२२/२३ या कालावधी पर्यंतच्या ५% निधी ग्रामपंचायतीच्या ग्राम निधी तून दिव्यांग बांधवाना त्वरित देण्यात यावे असे आदेश रावेर तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांना देण्यात यावे .
तसेच दिव्यांग बांधवांना ५०% घरपट्टी रकमे मध्ये सूट द्यावी.अशा स्वरूपाच्या मागणी प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच उपोषण स्थळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वरील मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण न झाल्यास प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे साखळी आंदोलन करण्यात येईल याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असा इशारा तालुकाध्यक्ष विनोद कोळी यांनी दिला आहे.