आरोग्यरावेर

तासखेडा गाव अनेक समस्यांच्या विळख्यात,घाणीचे साम्राज्य कायम

तासखेडा. ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज.अनिल इंगळे।। तासखेडा गावात घाणीचे साम्राज्य असून पावसामुळे त्यात मोठी भर पडली असल्याने तासखेडा ग्रामपंचायतीला जाग येईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी कि रावेर तालुक्यातील तासखेडा गावात घाणीचे साम्राज्य कायम असुन त्यात भर पडली ती म्हणजे साचलेले पाणी आणि चिखलमय रस्त्यांची यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे गावात प्रवेश करण्याचा मुख्यरस्ता सुद्धा चिखलमय होवून येण्या- जाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत असुन सुद्धा ग्रामपंचायत मात्र आपल्याच धुंदीत मग्न आहे. ग्रामपंचायत कुंभकर्णी झोपेत असल्याने गावातील रहीवाश्यांच्या अडचणीमध्ये घट न होता अधिका-धिक वाढ होत आहे.

तासखेडा गावातील सध्याची परिस्थिती एव्हढी विदारक आहे की संपूर्ण गावामध्ये एक दोन गल्लीचे रस्ते वगळता सर्वत्र घाणीचे साम्राज्य व चिखलमय रस्ते दिसत असुन नागरिकांच्या आरोग्याचा गंभिर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना अश्या एक ना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यात मुख्य म्हणजे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असुन लोकांना आपला जिव धोक्यात घालून पुर स्थितत नदीच्या गढुळ पाण्याने आपली तहान भागवावी लागत आहे. मात्र ग्रामपंचायत कसली ही उपाय योजना न करता नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे.तासखेडा गावाला अश्या एक ना अनेक समस्येने घेरले असुन नागरिकांमध्ये ग्रामपंचायत विरुद्ध तिव्र नाराजीची लाट पसरली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!