“धन्यवाद मोदीजी” अभियानास जिल्ह्यात सुरवात
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, भिमराव कोचुरे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस युवा मोर्चा प्रदेश प्रभारी विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली “धन्यवाद मोदीजी” अभियान राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. त्याच माध्यमातुन जळगाव जिल्हयात देखील ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजु मामा भोळे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंदुभाई पटेल, डॉ.राजेंद्र फडके भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ यांच्या सह जळगाव जिल्हातील सर्व भाजपा पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा कार्यकर्ते करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या ८ वर्षा पासून देशाच्या नागरिकांसाठी लोककल्याण कारी योजना राबविल्या जात आहेत. यात प्रामुख्याने गोर गरिबांना घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, महिलांना चूल मुक्ती व्हावी यासाठी उज्वला गॅस योजना, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया लोन योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगती साठी फसल बिमा योजना, ग्राम सिंचाई योजना, शेतकरी सन्मान योजना, कोविड काळात फळ विक्री व टपरी धारक यांना कुठल्याही प्रकारचे व्याज न घेता दहा हजार कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. गोर गरिबांन साठी मोफत धान्य वितरण, मोफत लसीकरण असेल अश्या प्रकारे बेटी बचाव, बेटी पढाव, सुकन्या योजना, जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेंशन योजना, सुरक्षा बिमा योजना या व्यतिरिक्त अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात व नागरिक या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणाकर घेतांना दिसून येते. अशा प्रकारे देशातील शेवटच्या घटकांना न्याय देण्याचे काम देशाच्या पंतप्रधानानी केले आहे. त्यामुळे या ऋणाची उतराई करण्यासाठी नागरिकांनी मिळाविलेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “धन्यवाद मोदीजी” या मजकुराचे पोस्टकार्ड नागरिकांच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे.
धन्यवाद मोदीजी अभियानास जिल्ह्यात सुरवात झाली असून विशेष अभियाना अंतर्गत आज दि.६ रोजी संपुर्ण महाराष्ट्रातील युवा मोर्चा रस्त्यावर उतरून विविध योजनांच्या लाभार्थांना भेटुन त्यांना यात सहभागी करणार आहेत.
या अभियानात भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून जिल्हातून वीस हजार पत्र देऊन अभियान यशस्वी करतील.अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन यांनी दिली