सेवानिवृत्ती रक्कमेच्या मोबदल्यात लाच मागणारा कनिष्ठ लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।
रावेर, प्रतिनिधी । येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ लिपीकाला सेवानिवृत्तीची रक्कम अदा करण्याचा बदल्यात अडीच हजाराची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत अधिक असे, सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाल्याने ग्रॅज्यूएटीची ३ लाख ९१ हजार ७१० रूपये रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी त्याच्या तक्रारदार मुलगाकडे रकमेच्या मोबदल्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज (वय-३०, राहणार मदिन कॉलनी रावेर) याने २ हजार रूपये आणि अर्जीत रजेची येणारी रक्कत बँक खात्या जमा करण्यासाठी ५०० असे एकुण अडीच हजार रूपयाची लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्याने त्यानुसार उप अधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, पो.नि. लोधी, सफौ.दिनेशसिंग पाटील यांच्या पथकाने सापळा रचून कनिष्ठ लिपीक शेख वसीम शेख फयाज याला लाचलुचपत विभागाने अटक करण्यात आली असून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.