खिर्डी येथील जीर्ण अवस्थेतील शौचालय अजून किती जनावरांचा घेणार बळी
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील बलवाडी रस्त्यावरील नवीन गावठाण भागातील शौचालय जीर्ण झाले असून जागोजागी तडा गेल्यामुळे कित्येक वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे सदर ठिकाणच्या सेफ्टी टाकीवर असलेले झाकण अद्यापही उघडे असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे गवत वाढले असून गावातील मोकळी जनावरे हिरवेगार गवत खाण्यासाठी येत असून अनेकदा सेफ्टी टाकीच्या खड्डयात म्हशीचे पारडू, गोवंशीय जनावरे पडून मृत्युमुखी पडले आहे.तसेच ग्रामस्थांच्या मदतीने बहुतांश वेळा अनेक जनावरांना जीवदान देण्यात आले आहे.
या भागातील रहिवाश्यांनी अनेक वेळा ग्रामपंचायत स्तरावर लेखी अथवा तोंडी सूचना देवूनही आजपर्यंत कोणत्याही प्रकारची उपाय योजना करण्यात आलेली नाही.सदरील पडके व जीर्ण शौचालय पाडणे कामी रावेर उपअभियंता यांच्याकडे एक वर्षापूर्वी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.परंतु अद्यापही कोणतेही प्रकारची कारवाई करण्यात आले नसल्याने सबंधित अधिकारी याकडे जाणून बुजून डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे.ग्राम पंचायत प्रशासनाने व संबधित विभागाने लक्ष देवून जीर्ण शौचालय बांधकाम पाडण्यात यावे अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.