स्वच्छ भारत मिशन योजनेचा फज्जा ; लुमखेडा येथे शौचालयांची अत्यंत बिकट अवस्था….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
लुमखेडा ता.रावेर (गोपाळ बार्हे )। राज्य शासनाने हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी स्वच्छ भारत योजनेंतर्गत लाखो रुपये खर्च करून सन 2019-20 या कालावधीत शौचालयाचे व पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले असून त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये दगड विटा व तत्सम वस्तूंचा खच पडलेला असून त्या ठिकाणी साफसफाई सुध्दा केली जात नाही अशी विदारक परिस्थिती असताना ग्रामीण भागात अजूनही त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
या बाबत अधिक न महितीआशी की,लूमखेडा ता,रावेर येथे एक वर्षांपासून शौचालयाचे बांधकाम झालेले असताना ते पाण्या अभावी वापरता येत नाही, तसेच आजु बाजुला गवत असल्यामुळे त्या ठिकाणी जायला रस्ता नाही.तर रात्री शौचालयात पुरेपूर उजेडाची व्यवस्था नसून एक ही लाईट त्या ठिकाणी लावण्यात आला नाही.त्या ठिकाणी पाणी साठविण्या करिता चोवीस तास पाणी उपलब्ध राहील अशी व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असताना कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नाही. स्वच्छ भारत योजने बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.परंतु सदर गाव हागणदारी मुक्त झाले याची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही.
निकृष्ट प्रतीच्या शौचालयांची नावालाच उभारणी केलेल्या गावातील नागरिक हातात लोटा घेवून उघड्यावर शौचास जातांना चे चित्र दिसून येत आहे तसेच गावात मुख्य रस्त्यावर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे नाकाला रुमाल लावून रस्ता पार करावा लागतो. शासना कडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही.तालुक्याच्या पं.स.कार्यालयात बसून ग्रामसेवक व अधिकारी यांनी संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झाले असे कागदोपत्री दाखवून स्वतःची पाठ तर थोपटून घेतली आणि लुमखेडा हे गाव हागणदारी मुक्त झाले असे दाखविण्यात आले आहे.परन्तु या ठिकाणी स्वच्छ भारत मिशन योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई करतील का? या कडे गावातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे