त्या चारही सरपंच, उपसरपंच व सदस्यांच्या अपात्रतेला हायकोर्टाची स्थगिती
तासखेडा. ता. रावेर. मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील रायपुर ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश युवराज पाटील. उपसरपंच तुकाराम सखाराम तायडे. सदस्य प्रकाश भिकारी तायडे, सौ. माधुरी योगेश चौधरी, व सौ. रेखा ज्ञानेश्वर तायडे अश्या एकून पाच जणांना ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्यामुळे रायपुर येथिल मनोहर लक्ष्मण पाटील यांच्या तक्रारी अर्जावरून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम१९५९ च्या कलम१४(१)( ज-३) अन्वये पाचही जणांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपाखाली अपात्र ठरवून १९ जुलै रोजी निर्णय पारित केला होता.
मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या अपात्रतेच्या निर्णयाला आव्हान देत औरंगाबाद खंड पिठाकडे दाद मांगितली असता काल दिनांक २४ ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपिठाने या चारही जणांना दिलासा देत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या रायपुर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला तुर्तास स्थगिती दिलेली आहे . त्यामुळे गावामध्ये तसेच परिसरामध्ये फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी ‘मंडे टू मंडे न्युज’ शि बोलतांना सांगितले की औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयामुळे आमच्या समवेत गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे. यामुळे रायपुर गावातील रखडलेल्या विकास कामांना पुन्हा गती मिळणार आहे.