भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ग्रामपंचायत सदस्याचे जलसमाधी आंदोलन अखेर स्थगित, पुनर्वसन विभागाचे लेखी आश्वासन

ऐनपुर,ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, विजय के अवसरमल। रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील पुनर्वसन हे दोन टप्प्यात झाले आहे, परंतु आजा पर्यत ऐनपुर गावातील पुनर्वसन भागात पुनर्वसन विभागकडुन नागरी सुविधा पुरविण्यासाठी ऐनपुर गावातील पुनर्वसन भागात पुनर्वसन अधिकारी यांनी पाहाणी करुन अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी योग्य ती कार्यवाही केली आहे व मंजुरी मिळताच पुनर्वसन भागातील नागरी सुविधा पुरविण्यात येणार आहे तरी ग्रामपंचायत सदस्यांनी प्रजासत्ताक दिनी जलसमाधी आंदोलन स्थगित करण्यात यावे असे लेखी आश्वासन दिल्याने ग्राम पंचायत सरपंच अमोल महाजन उप सरपंच दिपाली पाटील यांच्यासह सदस्यांनी प्रजासत्ताक दिनाचे(२६/०१/२०२३) चे जल समाधी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पत्रक काढले आहे.

ऐनपुर येथील पुनर्वसन भागातील नागरी सुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांना जलसमाधी आंदोलन करावे लागत असेल तर रावेर तालुक्यातील व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेत आहेत की काय अशी सर्वसामान्य जननेत चर्चेचा विषय ठरला आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील लोकप्रतिनीधींनी ऐनपूर गावातील पुनर्वसन भागातील विविध विकास कामांसाठी पुनर्वसन अधिकाऱ्यांनी जे अंदाजपत्रक तयार केलेले आहे त्याला तात्काळ मंजूरी देऊन ऐनपूर गावातील पुनर्वसन भागातील विकास कामांसाठी हातभार लावावा व गोरगरीब ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!