धामोडी येथे घाणीचे साम्राज्य, ग्रा.पं प्रशासनाचे दुर्लक्ष
खिर्डी ता रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। रावेर तालुक्यातील धामोडी येथील वॉर्ड क्र.२, राजे संभाजीनगर मध्ये मुख्य गटार दुर्गंधीयुक्त घाण पाण्याने व गाळाने पूर्णतः भरलेली असून या गटारितील पाणी वाहत नसल्यामुळे पाणी साचत असून नागरिकांना खूप त्रास होत आहे.तसेच रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांना बाहेर अंगणात थांबनेही आता मुश्किल होत आहे.
तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून गटारीचा उपसा होत नसल्यामुळे या ठिकाणी डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिकांना हिवताप डेंग्यू,मलेरिया टायफॉइड सारख्या विषाणूजन्य आजारांना तोंड द्यावे लागते अशा परिस्थितीत ना हाताला काम ना खिशात दाम या मुळे गोरगरीब लोक डॉक्टर कडे उपचार घेवू शकत नसल्याने त्यांचे आरोग्य खालावले जाते कोणाचे काही बरे वाईट झाल्यास यास जबाबदार कोण अशा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.या बाबत ग्रामस्थांनी अनेक वेळा तोंडी तक्रारी केल्या परंतु त्याचा काही एक उपयोग होत नसून ग्रा पंचायत प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाते.गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी नेहमी साफसफाई करणे गरजेचे असूनही त्याकडे जाणून बुजून कानाडोळा करीत असल्याचे चित्र यावरून दिसून येते. ग्राम पंचायत प्रशासनाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्वरित गटारींचा उपसा करून साफसफाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.