“मंडे टू मंडे” चा दणका ; खिर्डी परिसरातील रिक्षाचालकांनी भाडे कपात केल्यामुळे प्रवाशांना दिलासा
खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। खिर्डी ते सावदा या मार्गावर चालणाऱ्या प्रवाशी वाहतूक रिक्षा चालकांनी कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली असता.नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत ये जा करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रिक्षाचालकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत अवाच्या सव्वा भाडे वाढ केली होती.
परंतु शासनाने निर्बंध शिथिल केल्या नंतरही कोणत्याही प्रकारचे भाडे कमी करण्यात आले नव्हते या बाबत खिर्डी ऐंनपुर परिसरातील प्रवाशांची नेहमीच ओरड असल्याने या बाबत चौकशी केली असता रिक्षा भाडे आणि बस भाड्यात मोठी तफावत असल्याचे समजले.या बाबत यावर काही सुज्ञ नागरिकांनी वारंवार तोंडी समज दिली परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नव्हता याबाबत ” ” मंडे टु मंडे न्युज ” ने ‘रिक्षाचालकांची मनमानी प्रवाशांची आर्थिक लूट ‘ या मथळ्याखाली दि.२६ जून २०२२ रोजी वृत प्रकाशित केले होते.
या वृत्ताची रिक्षाचालकांनी दखल घेत सावदा ते खिर्डी या मार्गावरील प्रवाशी वाहतूक रिक्षाचालकांनी मीटिंग घेत प्रवाशी भाडे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रवाशी वाहतूक रिक्षाचालकांनी घेतलेल्या निर्णयामुळे खिर्डी ऐंनपुर परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.