भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

वंचित बहुजन आघाडीची कर्जोद येथे बैठक उत्साहात संपन्न

ऐनपुर,ता.रावेर, विजय के अवसरमल। वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक कर्जोद येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक शेख याकूब शेख नजीर, तालुका उपाध्यक्ष सुरेश अटकाळे , तालुका उपाध्यक्ष सलीम शहा, यासीन शहा , तालुका संघटक सुंदर सिंग बारेला यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाची रूपरेषा ध्येय धोरण उपस्थितांना समजून सांगितले.

श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे या भारत देशातले एकमेव नेते आहे की त्यांनी तळागाळातील वंचित, शोषित, आदिवासी ,ओबीसी , एस. सी. एस. टी. या समाजातील घटकांना सत्तेमध्ये बसवण्याचे काम रात्रंदिवस सुरू केले असून लवकरच येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सत्तेमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही असे ठरवून इथल्या वंचित समाजासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागले पाहिजे. असे आदेश श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडी या पक्षाची रूपरेषा आणि पुढील वाटचाली आणि प्रचार करण्यासाठी कर्जोद या गावां पासून सुरुवात केली असून पुढील काळात संपूर्ण रावेर तालुका पिंजुन काढल्याशिवाय राहणार नाही आणि लवकरच रावेर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे खाते उघडल्याशिवाय शांत बसणार नाही. असे अध्यक्षीय भाषणामध्ये वंचित बहुजन आघाडीचे रावेर तालुका अध्यक्ष बाळू शिरतुरे म्हणाले.

बैठकीला दौलत अडांगळे, विजय ससाने, विनय ससाने, गणेश ससाने ,फिरोज तडवी, नरेंद्र ससाणे ,सुधीर ससाने , यासीन तडवी, हसन तडवी ,धनराज ससाने, गौतम ससाने, मोहन ससाने, गौरव ससाने, शरीफ तडवी, भारत ससाने, ईश्वर ससाने, मनीष ससाने ,गिरीश ससाने, गौरव ससाने , आकाश ससाने, काशिनाथ ससाने, संदीप ससाने ,किशोर ससाने ,रवी ससाने, जगदीश ससाने, इत्यादी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन अजय तायडे यांनी केले. व आभार मनोहर ससाने यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!