भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथील पत्रकार कैलास लवंगडे यांना राष्ट्रीय भूषण पुरस्कार

सावदा,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या निमित्त प्रा. मनोहर धोंडे श्रीक्षेत्र कपीलधार, ता. जि. बीड येथे होणाऱ्या यात्रेमध्ये “भव्य राज्यव्यापी वार्षिक मेळावा आयोजित करण्यात येत असून जळगाव जिल्ह्यातील एकमेव दैनिक पुण्य नगरीचे पत्रकार व ओरिजनल पत्रकार संघाचे उपाध्यक्ष कैलास भाऊलाल लवंगडे पुरस्कार जाहीर करून सन्मानीत करण्यात येणार आहे .

मेळाव्यात कोरोणामुळे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत. परंतु मागील वर्षी पासून श्री क्षेत्र कपीलधार येथे प्रथेप्रमाणे पुरस्कार दिलेले आहेत. त्यामुळे यंदाही दि 07 नोव्हें. 2022 रोज सोमवारी दुपारी 4 वाजता 27 व्या राज्यव्यापी वार्षिक मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्याच्या निमित्ताने शिवा संघटनेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील वीरशैव-लिंगायत समाजाच्या मान्यवरांना “शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार जाहिर करुन, सन्मानचिन्ह व सन्मान पत्रासह मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. देशातील वीरशैव-लिंगायत समाजात अत्यंत प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या शिवा संघटनेच्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची निवड शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी नुकतीच जाहिर केली आहे.

या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण –

कैलास भाऊलाल लवंगडे यांचा सत्कार दि. 07 नोव्हेंबर 2022 रोज सोमवारी श्रीक्षेत्र कपिलधार ता. जि. बीड येथे शिवा संघटनेच्या होणाऱ्या 27 व्या राज्यव्यापी वार्षीक मेळाव्यात सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल-श्रीफळ देवून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे व अनेक गुरुवर्य आणि पालकमंत्री बीड मा. ना. अतुल सावे, केंद्रिय राज्यमंत्री मा. ना. डॉ. भागवत कराड, शिवसेना नेते मा. चंद्रकांत खैरे, माजी मंत्री मा. आ. जयदत्त अण्णा क्षिरसागर यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!